मुंबई (रमेश औताडे) : आंबेडकरी रिपब्लिकन मोर्चाच्या वतीने भिमा कोरेगाव शौर्य दिनानिमित्त भिमा कोरेगाव येथून सुरू होणारे
अभियान संपूर्ण राज्यात राबविण्यात येणार असून यांची सांगता संभाजी नगर डॉ बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठ औरंगाबाद येथे १४ जानेवारी ला होणार आहे. अशी माहितीआंबेडकरी रिपब्लिकन मोर्चाचे राष्ट्रीय अध्यक्ष नारायण बागडे यांनी दिली.

आंबेडकरी चळवळीतील भीम सैनिक हाच आंबेडकरी चळवळीला योग्य दिशा देऊन संविधानाचे रक्षण करत
आंबेडकरी बाणा जिवंत ठेऊ शकतो. त्यासाठी भीम सैनिकांची जनगणना झाली पाहिजे. अशी मागणी आंबेडकरी रिपब्लिकन मोर्चाचे राष्ट्रीय अध्यक्ष नारायण बागडे यांनी केली आहे.
यावेळी महिला मोर्चा प्रदेश अध्यक्षा कविता घाडगे, मुंबई प्रदेश प्रभारी विकास काटे, शामभाई बागुल आदी पदाधिकारी उपस्थित होते.