Sunday, December 15, 2024
घरआरोग्यविषयकलीलावती रुग्णालयात हृदयाच्या दुर्मिळ आजारावर महिलेवर यशस्वी शस्त्रक्रिया

लीलावती रुग्णालयात हृदयाच्या दुर्मिळ आजारावर महिलेवर यशस्वी शस्त्रक्रिया

मुंबई(प्रतिनीधी) : जगभरातील १८ केसेस मधील ६ केसेस भारतात नोंद झालेल्या हृदयाच्या एका दुर्मिळ आजाराने मला ग्रासले होते. मी जगण्याची आशा सोडली होती. मात्र या दुर्मिळ आजारावर ७ तास मोफत शस्त्रक्रिया करून डॉक्टरांनी मला पुनर्जन्म दिला. अशी प्रतिक्रिया जळगाव येथील शेतमजूर असलेल्या सीमा पाटील या रुग्ण महिलेने मुंबईत एका पत्रकार परिषदेत  दिली.

मुंबईतील बांद्रा येथील लीलावती रुग्णालयातील हृदयरोग तज्ञ डॉ. पवन कुमार, डॉ. नितीन गोखले, डॉ. नम्रता कोठारी यांनी जळगाव येथील सीमा पाटील या ४१ वर्षीय महिलेवर ७ तास शस्त्रक्रिया करून मुंबईतील पाहिली दुर्मिळ शस्त्रक्रिया पूर्ण करून एक विक्रम केला.

१५ लाख खर्चाची हि शस्त्रक्रिया लीलावती रुग्णालयाचे मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ. नीरज उत्तमानी यांनी या  एक रुपयाही या शेतमजूर सीमा पाटील या रुग्ण महिलेकडून घेतला नाही. सरकारी आरोग्य योजना व केंद्र सरकारच्या आरोग्य योजना यांचा लाभ कमी असतो. त्यामुळे त्या योजनांच्या माध्यमातून ऑपरेशन करायचे तर ती मदत केव्हा मिळणार याची वाट न पाहता रुग्णाच्या तब्बेतीचा विचार करून रुग्णांवर त्वरित शस्त्रक्रिया केली.तो संपूर्ण खर्च रुग्णालयाने उचलला असे डॉ पवनकुमार यांनी सांगितले.

RELATED ARTICLES

प्रतिक्रिया द्या

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा

Most Popular

Recent Comments