Sunday, December 15, 2024
घरमहाराष्ट्रडाॅ.नीलकंठ धारेश्वर महाराज यांना स्पंदन जीवन गौरव पुरस्कार जाहीर

डाॅ.नीलकंठ धारेश्वर महाराज यांना स्पंदन जीवन गौरव पुरस्कार जाहीर

पाटण तालुक्यातील डाकेवाडी (काळगांव) येथील स्पंदन चॅरिटेबल ट्रस्ट यांच्यावतीने देण्यात येणारा स्पंदन जीवन गौरव पुरस्कार यावर्षी श्री.ष.ब्र.प्र.108 डाॅ.नीलकंठ शिवाचार्य महास्वामी धारेश्वर महाराज, मठाधिपती आदिमठ संस्थान धारेश्वर यांना देण्यात येणार असल्याची माहिती ट्रस्टचे संस्थापक/अध्यक्ष डाॅ.संदीप डाकवे यांनी दिली आहे. गत वर्षापासून या पुरस्काराचे स्वरुप रोख रक्कम पाच हजार रुपये, मानपत्र, ग्रंथ आणि कोल्हापूरी फेटा असे ठेवण्यात आले आहे.
यापूर्वी स्पंदन जीवन गौरव पुरस्कार अग्रलेखांचे बादशहा पद्मश्री नीलकंठ खाडीलकर (भाऊ), पद्मश्री डाॅ.विजय शहा, अँड.जनार्दन बोत्रे, खा.श्रीनिवास पाटील, प्राचार्य डाॅ.यशवंत पाटणे यांना देण्यात आला आहे.
सदरील पुरस्काराचे हे सहावे वर्ष आहे. या कार्यक्रमात प्राईड ऑफ स्पंदन अवॉर्ड, राज्यस्तरीय स्व.राजाराम डाकवे (तात्या) साहित्य पुरस्कारही वितरित केले जाणार आहेत. तसेच दिवाळी अंक स्पर्धा, सेल्फी विथ गुढी स्पर्धा, स्पर्धेतील विजेत्यांचाही सन्मान केला जाणार आहे.
या पुरस्काराचे वितरण शनिवार दि.21 डिसेंबर, 2024 रोजी सकाळी 10 वाजता कराड, ता.कराड, जि.सातारा येथे होणार आहे. याप्रसंगी याप्रसंगी मुख्यमंत्री सहायता निधीचे कक्षप्रमुख मंगेश चिवटे सुप्रसिध्द पार्श्वगायिका कविता राम, सुप्रसिध्द मालिका दिग्दर्शक विठ्ठल डाकवे, सुप्रसिध्द अभिनेते पंकज काळे, राष्ट्रवादी काॅंग्रसे शरदचंद्र पवार महिला आघाडीच्या राष्ट्रीय कार्यकारिणी सदस्या सौ. संगिता साळुंखे, कराड शहर पोलीस स्टेशनच्या पोलीस उप निरीक्षक सौ.रेखा देशपांडे, पत्रकार गजानन तुपे, अभिनेत्री अमृता उत्तेरवार, अभिनेत्री मनीषा मोरे, अभिनेत्री काजल राऊत व अन्य मान्यवर उपस्थित राहणार आहेत. तरी याप्रसंगी जास्तीत जास्त लोकांनी उपस्थित रहावे असे आवाहन स्पंदन चॅरिटेबल ट्रस्टचे पदाधिकारी यांनी केले आहे.

प्रतिनिधी : पाटण तालुक्यातील डाकेवाडी (काळगांव) येथील स्पंदन चॅरिटेबल ट्रस्ट यांच्यावतीने देण्यात येणारा स्पंदन जीवन गौरव पुरस्कार यावर्षी श्री.ष.ब्र.प्र.108 डाॅ.नीलकंठ शिवाचार्य महास्वामी धारेश्वर महाराज, मठाधिपती आदिमठ संस्थान धारेश्वर यांना देण्यात येणार असल्याची माहिती ट्रस्टचे संस्थापक/अध्यक्ष डाॅ.संदीप डाकवे यांनी दिली आहे. गत वर्षापासून या पुरस्काराचे स्वरुप रोख रक्कम पाच हजार रुपये, मानपत्र, ग्रंथ आणि कोल्हापूरी फेटा असे ठेवण्यात आले आहे.
यापूर्वी स्पंदन जीवन गौरव पुरस्कार अग्रलेखांचे बादशहा पद्मश्री नीलकंठ खाडीलकर (भाऊ), पद्मश्री डाॅ.विजय शहा, अँड.जनार्दन बोत्रे, खा.श्रीनिवास पाटील, प्राचार्य डाॅ.यशवंत पाटणे यांना देण्यात आला आहे.
सदरील पुरस्काराचे हे सहावे वर्ष आहे. या कार्यक्रमात प्राईड ऑफ स्पंदन अवॉर्ड, राज्यस्तरीय स्व.राजाराम डाकवे (तात्या) साहित्य पुरस्कारही वितरित केले जाणार आहेत. तसेच दिवाळी अंक स्पर्धा, सेल्फी विथ गुढी स्पर्धा, स्पर्धेतील विजेत्यांचाही सन्मान केला जाणार आहे.
या पुरस्काराचे वितरण शनिवार दि.21 डिसेंबर, 2024 रोजी सकाळी 10 वाजता कराड, ता.कराड, जि.सातारा येथे होणार आहे. याप्रसंगी याप्रसंगी मुख्यमंत्री सहायता निधीचे कक्षप्रमुख मंगेश चिवटे सुप्रसिध्द पार्श्वगायिका कविता राम, सुप्रसिध्द मालिका दिग्दर्शक विठ्ठल डाकवे, सुप्रसिध्द अभिनेते पंकज काळे, राष्ट्रवादी काॅंग्रसे शरदचंद्र पवार महिला आघाडीच्या राष्ट्रीय कार्यकारिणी सदस्या सौ. संगिता साळुंखे, कराड शहर पोलीस स्टेशनच्या पोलीस उप निरीक्षक सौ.रेखा देशपांडे, पत्रकार गजानन तुपे, अभिनेत्री अमृता उत्तेरवार, अभिनेत्री मनीषा मोरे, अभिनेत्री काजल राऊत व अन्य मान्यवर उपस्थित राहणार आहेत. तरी याप्रसंगी जास्तीत जास्त लोकांनी उपस्थित रहावे असे आवाहन स्पंदन चॅरिटेबल ट्रस्टचे पदाधिकारी यांनी केले आहे.

RELATED ARTICLES

प्रतिक्रिया द्या

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा

Most Popular

Recent Comments