Tuesday, April 29, 2025
घरमहाराष्ट्रजनता दल प्रदेशाध्यक्ष नाथाभाऊ शेवाळे यांनी घेतली उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची भेट

जनता दल प्रदेशाध्यक्ष नाथाभाऊ शेवाळे यांनी घेतली उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची भेट

प्रतिनिधी :  राज्यामध्ये भाजप प्रणित महायुतीला स्पष्ट बहुमत मिळाल्या बद्दल जनता दल सेक्युलर प्रदेशाध्यक्ष नाथाभाऊ शेवाळे यांनी उपमुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस यांची त्यांच्या मुंबई येथील सागर बंगल्यावर भेट घेऊन अभिनंदन केले. दरम्यान उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची जनता दल सह महायुतीतील इतर घटक पक्षांच्या प्रमुखांनी भेट घेतली. या भेटी दरम्यान उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी मिळालेल्या महाविजया बद्दल महायुतीतील घटक पक्षांचे आभार मानले व यावेळी त्यांनी बोलताना सांगितले की, सरकार स्थापन झाल्यावर सरकारमध्ये सर्व घटक पक्षांच्या पदाधिकारी यांना सन्मानाची वागणूक भेटेल असे आश्वासन उपमुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस यांनी महायुतीतील घटक पक्षाच्या प्रमुखांना दिले.

RELATED ARTICLES

प्रतिक्रिया द्या

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा

Most Popular

Recent Comments