Sunday, December 15, 2024
घरमहाराष्ट्रसद्गुरु बाबा महाराज हायस्कूल सवादे येथे यशवंतराव चव्हाण स्मृतिदिन उत्साहात साजरा

सद्गुरु बाबा महाराज हायस्कूल सवादे येथे यशवंतराव चव्हाण स्मृतिदिन उत्साहात साजरा


प्रतिनिधी (प्रताप भणगे) :  यशवंतराव बळवंतराव चव्हाण ते महाराष्ट्राचे मुख्यमंत्री होते. त्यांनी काही काळ भारताचे  उपपंतप्रधान  म्हणून काम केले होते. तर काही काळ ते भारताचे संरक्षणमंत्री सुद्धा होते. यशवंतराव बळवंतराव चव्हाण यांचा जन्म१२ मार्च १९१३ रोजी सांगली जिल्ह्यातील देवराष्ट्रे या गावी झाला. महाराष्ट्राचे पहिले मुख्यमंत्री व महाराष्ट्राचे शिल्पकार म्हणून ते ओळखले जातात. ते प्रागतिक विचारसरणीचे होते. उत्कृष्ट संसदपटू, उदारमतवादी व अभ्यासू व्यक्तिमत्व म्हणून त्यांची ख्याती आहे. ते रसिक व साहित्यिकही होते. “युगांतर”, “सह्याद्रीचे वारे”, “कृष्णाकाठ”, “ऋणानुबंध” ही त्यांची साहित्यसंपदा आहे.
सन १९५६ मध्ये स्थापन झालेल्या द्विभाषिक मुंबई राज्याचे पहिले मुख्यमंत्री म्हणून त्यांची निवड झाली. १ मे १९६० रोजी मुंबईसह स्वतंत्र महाराष्ट्र निर्माण झाल्यानंतर महाराष्ट्राचे पहिले मुख्यमंत्री म्हणूनही त्यांचीच निवड झाली. १९६२ मध्ये चीन युद्धाच्या काळात तत्कालीन पंतप्रधान पंडित नेहरूंनी यशवंतरावांची नेमणूक देशाच्या संरक्षणमंत्रीपदावर केली.
त्यांचा स्मृतिदिन सवादे हायस्कूलमध्ये चव्हाण साहेबांचे सहकारी श्री ज्ञानदेव विष्णू शेवाळे यांच्या समवेत मुख्याध्यापिका सौ. दरेकर उषा रंगराव ,
उपशिक्षक श्री पाटील पी.जे. , श्री घार्गे बी.के. , सौ कदम एम .ए. , श्री जाधव एस. व्ही. , श्री वाघमारे सी. डब्ल्यू. , सौ थोरात व्ही. एस. , सौ साठे पी.एम.
शिक्षकेतर कर्मचारी – श्री सुर्वे एस. एम. , श्री. पवार जे .एन. , श्री अनिल आपटे व शाळेतील विद्यार्थी यांनी साजरा केला.

RELATED ARTICLES

प्रतिक्रिया द्या

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा

Most Popular

Recent Comments