ताज्या बातम्या
धारावीकरांना ५००, चाळी-इमारतीतील रहिवाशांना १,००० चौ. फुटांची घरे द्या ; मास्टर प्लॅन व पुनर्वसनाची कायदेशीर हमी मिळेपर्यंत करार न करण्याचे आवाहन‘वाजवा शाळेचा गजर, नको रे बाबा पुन्हा गेट टू गेदर!’ जुन्या आठवणी, मैत्री आणि नातेसंबंधांचा वास्तववादी वेध; आवर्जून पाहावे असे नाटकखारघर हिल महापौर मॅरेथॉन’ स्पर्धेत आयुक्त डॉ. शिंदे यांची यशस्वी धावगणेशोत्सवाच्या उत्साहाला गालबोट! २२ फुटी ‘भुलेश्वरचा राजा’ अचानक कोसळला; २ जणांचा मृत्यू, ५ जखमी”व्यसनांपासून दूर राहून विद्यार्थ्यांनी शिक्षण, क्रीडा, कौशल्य विकास आणि राष्ट्र उभारणीकडे वळावे – मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे आवाहन

तर छगन भुजबळांविरोधात निवडणूक लढवणार – आय ए सी अध्यक्ष हेमंत पाटील

मुंबई (रमेश औताडे) : राज्यात बहु‌संख्येने असलेल्या इतर मागासवर्गीयांच्या समस्या आहे तिथेच आहेत. तथाकथित ओबीसी नेत्यांनी समाजाच्या मतांचा वापर केवळ आपल्या राजकीय फाय‌द्यासाठी करून घेतला, असा थेट आरोप करत इंडिया अगेन्स्ट करप्शनचे (आय ए सी ) राष्ट्रीय अध्यक्ष व ओबीसी नेते हेमंत पाटील यानी शनिवारी मुंबई मराठी पत्रकार संघ येथे आयोजित पत्रकार परिषदेत मंत्री छगन भुजबळांविरोधात निवडणूक लढवणार असल्याचे सांगितले.

मराठा आरक्षणासाठी सुरु असलेला आरक्षण आंदोलनकर्ते मनोज जरांगे पाटील यांच्या लढ्‌याला पुर्ण समर्थन असल्याचे यावेळी पाटील यांनी जाहिर केले. जरांगे पाटील यांनी संधी दिली तर ओबीसी आणि मराठा बांधवांच्या वतीने नाशिक मधून छगन भुजबळांविरोधात निवडणूक लढवण्यास तयार असल्याचे पाटील म्हणाले. भूजबळ आणि काही तथाकथित नेत्यांना धडा शिकवण्यासाठी राज्यभरात त्याच्याविरोधात समक्ष उमेदवार देण्याचा संघटनेचा प्रयत्न असणार आहे.

मनोज जरांगे यांनी ओबीसी कोट्यातून मराठ्यांना आरक्षण देण्याची मागणी रास्तच आहे. त्यामुळे ओबीसी समाजाने मोठे मन दाखवून जरांगे यांना समर्थन दिले तर, आगामी काळात ओबीसी-मराठा समाजाच्या नेतृत्वाला एक नवीन दिशा मिळेल. असे मत पाटील यांनी व्यक्त केले.

ओबीसी समाजाच्या तरुणांमध्ये बेरोजगारीच्या वाढत्या प्रमाणामुळे प्रचंड नैराश्य पसरल्याचे चित्र आहे. केंद्र आणि राज्य सरकारच्या योजना थेट नागरिकांपर्यंत पोहचल्या नाहीत. काही तथाकथित नेत्यानी आरक्षणाच्या मुद्दयावर ओबीसी विरोधात मराठा असा संघर्ष पेटवण्याचा प्रयत्न केला. पंरतु, आता राज्यातील ओबीसी-मराठा बहुजनांना भासणारी सक्षम नेतृत्वाची पोकळी जरांगे पाटीलच भरू शकतात, असा विश्वास पाटील यांनी व्यक्त केला.

Scroll to Top