.
कराड : रोटरी क्लब ऑफ कराडचे विविध उपक्रम आणि सेवाकार्य जाणून घेतले. या क्लबला इतिहास व 68 वर्षांची वाटचाल आणि असलेला वारसा यातून सुरु असलेले विविध प्रकल्प हे प्रेरणादायी असल्याचे गौरवोद्गार रोटरीचे डिस्ट्रिक्ट गव्हर्नर डॉ.रो.सुरेश साबू यांनी काढले.
येथील हॉटेल पंकज हॉल मध्ये आयोजित रोटरी क्लब ऑफ कराडच्या डिस्ट्रिक्ट गव्हर्नर व्हिजिटनिमित्त जनरल मिटींग मध्ये ते बोलत होते. यावेळी असिस्टंट गर्व्हनर राजीव रावळ, फर्स्ट लेडी रो.निर्मला साबू, रोटरी क्लब ऑफ कराडचे अध्यक्ष रो.रामचंद्र लाखोले, सचिव रो.आनंदा थोरात यांची प्रमुख उपस्थिती होती.
रोटरी ऍक्टिव्हिटी सेंटर ही स्वत:ची वास्तुचे कौतुक करीत अन्नछत्र, गर्भसंस्कार शिबीर, मधुमेहामुळे होणारे नेत्रविकार शिबीर, रोटरी आशा एक्स्प्रेसद्वारे कर्करोग निदान तपासणी शिबीर, मनाचे व्यवस्थापन, आरोग्य सुविधा केंद्र, अत्यल्प दरात एचपीव्ही लसीकरण शिबीर आदींसह विविध प्रकल्पांची त्यांनी प्रशांसा केली.
रोटरी क्लब ऑफ कराडचे अध्यक्ष रो.रामचंद्र लाखोले यांनी चालू वर्षांमध्ये सुरु असलेले प्रकल्प आणि नव्याने राबविण्यात येणाऱ्या प्रकल्पांची माहिती देत डिस्ट्रिक्ट कडून रोटरी क्लब ऑफ कराड ला भरघोस मदत करण्याची मागणी केली.
यावेळी डिस्ट्रिक्ट गव्हर्नर रो.डॉ.सुरेश साबू, असिस्टंट गव्हर्नर राजीव रावळ यांचे उपस्थितीत रोटरी क्लबचे मानद सभासद म्हणून कराड तालुका पंचायत समितीचे गटविकास अधिकारी प्रताप पाटील व 10 नवीन सभासद यांचा पदग्रहण करण्यात आले. यावेळी पर्यावरण संवर्धनासाठी पुढाकार घेउन फक्त शाडूच्या मातीचे गणपती मुर्ती बनविणारे भरत कुंभार, त्याचबरोबर कराड शहरात विज वितरण कंपनी मध्ये उल्लेखनीय काम करणारे सुरेश पाटील यांना रोटरीच्या वतीने सन्मानित करण्यात आले. रोटरी संगम या त्रेमासिकाचे ही प्रकाशन करण्यात आले.
रो.शिवराज माने, रो.पल्लवी यादव, रो.किरण जाधव यांनी सुत्रसंचालन केले. सचिव रो.आनंदा थोरात यांनी आभार मानले.
दरम्यान, राजमाची येथील रोटरी क्लब ऑफ कराडच्या वतीने निर्माण करण्यात येत असलेल्या निसर्ग उद्यानचे उद्घाटन व वृक्षारोपन डॉ.रो.सुरेश साबू यांच्या हस्ते करण्यात आले. तेथील पाण्याच्या टाकीचे उदघाटन रो.डॉ.भास्कर जाधव यांचे हस्ते करण्यात आले. रोटरी ऍक्टिव्हिटी सेंटर येथे संचालक मंडळाची सभा संपन्न झाली. यावेळी झालेले प्रोजेक्ट व डिस्ट्रिक्टने दिलेले गोल्स व त्यावरील कामाची सविस्तर माहिती देण्यात आली. डिस्ट्रिक्ट गव्हर्नर रो.डॉ.सुरेश साबू यांनी उपस्थित संचालकांना मार्गदर्शन केले व रोटरी क्लब कराडच्या चालू असलेल्या कामाबाबत समाधान व्यक्त केले. त्यानंतर अध्यक्ष व सचिव यांना घेऊन रोटरी क्लब कराड च्या चालू असलेल्या कामाचा आढावा, सर्व अहवाल तपासले व क्लब च्या कामाची प्रसंशा केली.