प्रतिनिधी : श्रावण महिना संपला की महिलांना चाहूल लागते ती म्हणजे गौरी गणपती या सणाची. घरगुती गौरी गणपती या सजावटीमध्ये महिला विशेष करून वेगवेगळे देखावे सादर करण्याचा प्रयत्न करतात. त्यामध्ये धोंडेवाडी तालुका कराड येथील श्री प्रल्हाद दाजी काकडे यांच्या घरी गणेशोत्सवानिमित्त शिवपार्वती विवाह सोहळा आयोजित केलेला आहे. या विवाह सोहळ्यामध्ये मुहूर्त मेढ, चुडा भरणे, मेहंदी, हळदी समारंभ, लग्न सोहळा, रुखवत असा देखावा दाखविण्यात आलेला आहे. यामध्ये देखावा सादर करताना गौरी सजावटीमध्ये हुबेहूब देखावा दाखवण्यात आला आहे. या उत्सवामुळे जुनी परंपरा दाखवण्याचा प्रामाणिक प्रयत्न केला आहे. हा उत्सव पाहण्यासाठी आजूबाजूच्या परिसरातून देखील महिला मोठ्या प्रमाणात उपस्थित राहिल्या होत्या,यावेळी काही महिलांनी गौरी गीते गाऊन मनमुराद गौरी सणाचा आनंद घेतला.
धोंडेवाडी, कराड येथे गौरी सणानिमित्त शिवपार्वती विवाह सोहळा
RELATED ARTICLES