प्रतिनिधी (प्रताप भणगे) : ज्येष्ठ सामाजिक कार्यकर्ते व श्रमिक मुक्ती दलाचे अध्यक्ष डॉ. भारत पाटणकर साहेब यांच्या अमृतमहोत्सवी वर्षानिमित्त ज्येष्ठ नेते, माजी केंद्रीय कृषिमंत्री खा.शरद पवार यांच्या हस्ते कोल्हापूर येथील राजर्षी शाहू छत्रपती स्मारक भवनमध्ये त्यांचा जाहीर नागरी सत्कार व कार्यगौरव करण्यात आला. या समारंभास खा.विशालदादा पाटील यांनी उपस्थित राहून डॉ.भारतजी पाटणकर यांच्या कार्याचा गौरव करून अमृतमहोत्सवी वर्षानिमित्त व पुढील वाटचालीसाठी त्यांना शुभेच्छा दिल्या.
गेल्या ५० वर्षांपासून डॉ. भारतजी पाटणकर हे श्रमिक, कष्टकरी, दलित, आदिवासी, शोषित, वंचित, धरणग्रस्त व दुष्काळग्रस्तांच्या हक्कांसाठी लढा देत असून, धरणग्रस्त व दुष्काळग्रस्तांचे प्रश्न सोडवून त्यांना न्याय मिळवून देण्याचे काम त्यांनी केले आहे. त्यांच्या समर्पित कार्याला आणखी बळ मिळो, अशा सदिच्छा त्यांना दिल्या. याप्रसंगी खा. छत्रपती शाहू महाराज, आ. कृतुराज पाटील , मा.डॉ.गोपाळ गुरू, मा.मनीषा गुप्ते यांच्यासह डॉ. भारत पाटणकर अमृतमहोत्सवी कार्य गौरव समितीचे पदाधिकारी व सर्व क्षेत्रातील मान्यवर उपस्थित होते.
सामाजिक कार्यकर्ते डॉ भारत पाटणकर यांचा शरद पवार यांच्या हस्ते गौरव
RELATED ARTICLES