वाई(अजित जगताप) : वाई नगरपालिकेच्या निवडणुकीमध्ये शिवसेनेच्या वतीने नगराध्यक्ष पदावर ए.बी. फॉर्म अर्ज दाखल करण्यात आला. आणि फसगत झाली. श्री विकास शिंदे यांनी केलेली गद्दारी शिवसैनिकांनी मनात ठेवावी व योग्य वेळी परतफेड करू असा गर्भित इशारा सातारा जिल्ह्याचे पालकमंत्री व शिवसेना नेते शंभूराज देसाई यांनी वाई येथे झालेल्या जाहीर सभेत दिला आहे.
फसगत सारखी सारखी होत नाही. गद्दारीच्या मुळे त्याचे परिणाम व्याजासह परतफेड करणार आहे आणि जे वाई नगर परिषदेमध्ये शिवसेनेच्या ए.बी. फॉर्म वर निवडणूक लढवत आहे .त्यांच्या पाठीशी खंबीरपणे शिवसैनिक व मतदार राहतील असेही त्यांनी विश्वास व्यक्त केला. एका रात्रीत काय झाले. त्याच्या खोलात जात नाही पण राजकारणात असे करणे योग्य नाही. शिवसेनेने विश्वास दाखवला त्या विश्वासाला तडा गेला आहे असे श्री देसाई यांनी स्पष्ट केले.
वाईतील मतदारांना विकासाचे गाजर दाखवून दिशाभूल करणाऱ्या सत्ताधाऱ्यांना जनता धडा शिकविल्याशिवाय राहणार नाही. वाईतील काही अपप्रवृत्तीना बळी पडून नगराध्यक्ष पदाचा उमेदवारी अर्ज मागे घेण्याचे चुकीचे काम केले आहे. पाठीत खंजीर खुपसणाऱ्यांना विकास शिंदे यांना हिसका दाखवणार आहे. जरी शिवसेनेचा नगराध्यक्ष पदाचा उमेदवार रिंगणात नसेल तरी पालिकेतील नगराध्यक्ष हा शिवसेनेच्या मदतीशिवाय निवडून येणार नाही, वाई नगरपालिकेचा नगराध्यक्ष शिवसेनाच ठरविणार असा सूचक इशारा पालकमंत्री शंभूराज देसाई यांनी वाईत आयोजित नगरपालिका
उमेदवारांच्या प्रचार सभेत बोलताना दिला.
यावेळी शिवसेनेचे जिल्हा प्रमुख रणजीत भोसले, उपजिल्हा प्रमुख प्रदीप माने, संपर्क प्रमुख शरद कणसे,
महिला जिल्हा प्रमुख शारदाताई जाधव, तालुका प्रमुख रवींद्र भिलारे, दिलीप पवार, उपतालुका प्रमुख प्रतापराव भिलारे, युवा नेते यशराज भोसले, विक्रम वाघ, तालुका संघटक युवराज कोंढाळकर, शहर प्रमुख गणेश सावंत, महिला तालुका प्रमुख सुजाता गायकवाड, गणेश पवार,
नगरपालिकेचे उमेदवार योगेश फाळके, माया चौधरी, सतीश वैराट, कृष्णा भागवत, विमल लोखंडे, निलेश
मोरे अस्मिता सावंत यांची प्रमुख उपस्थिती होती. शिवसेनेला युती करण्याचे सर्व पर्याय खुले असून
शिवसेनेच्या मदतीशिवाय नगराध्यक्ष होवू शकत नाही, असा इशारा सुध्दा पालकमंत्र्यांनी दिला आहे वाई
शहरातील अनेक प्रलंबित प्रश्न मार्गी लावणे बाकी आहेत. यामध्ये छ. शिवाजी महाराज पुतळा, नाना नानी
अपूर्ण राहिलेले काम, यासारखे अनेक प्रश्न प्रलंबित आहेत. तसेच नगराध्यक्ष पदाचा उमेदवारी अर्ज माघारी घेवून पक्षाची प्रतिमा मलीन करणाऱ्यांवर पक्ष कडक कारवाई करणार पाठीत खंजीर खुपसणान्यावर शिस्तभंगाची कारवाई करण्यात आलेली आहे. शिवसेनेच्या मदतीशिवाय नगराध्यक्ष होवू शकत नाही
शंभूराज देसाई म्हणाले, राज्याच्या कारभारात शिवसेना, भाजपा व राष्ट्रवादी एकत्रित काम करीत असले
तरीही शिवसेनेच्या वरिष्ठ नेत्यांनी स्थानिक पातळीवर सन्मानाने युती झाल्यास करा अन्यथा शिवसेना
स्वतंत्र निवडणूक लढविणार,वाई नगरपालिकेच्या निवडणुकीत भाजपाकडून हवात्तसा प्रतिसाद
न मिळाल्याने शिवसेना धनुष्यबाणाच्या चिन्हावरचे निवडणूक लढवत आहे असे त्यांनी सांगितले. दरम्यान शिवसेनेची गद्दारी करणाऱ्या प्रकरणामुळे वाईतील शिवसैनिक पेटून उठला आहे. असे शिवसेना जिल्हाप्रमुख रणजितसिंह भोसले यांनी शिवसैनिकांना मार्गदर्शन करताना सांगितले.
—– —— —— —- —
फोटो- वाई येथील जाहीर सभेत मार्गदर्शन करताना शिवसेना नेते व सातारा जिल्हा पालकमंत्री शंभूराज देसाई (छाया– अजित जगताप, वाई)
.




