ताज्या बातम्या

प्रचाराची मुदत वाढली; आता 1 डिसेंबर रात्री 10 वाजेपर्यंत प्रचाराला परवानगी

प्रतिनिधी : राज्यातील 246 नगरपालिका आणि 42 नगरपंचायतींच्या निवडणुकीची रणधुमाळी चांगलीच वाढली असून सर्वच राजकीय पक्षांचे नेते प्रचारात गुंतले आहेत. अशातच राज्य निवडणूक आयोगाने प्रचाराच्या वेळेत बदल करण्याचा महत्त्वपूर्ण निर्णय घेतला आहे.

याआधी प्रचाराची मुदत 30 नोव्हेंबर सायंकाळी 5 वाजेपर्यंत निश्चित करण्यात आली होती. मात्र आता आयोगाने त्यात वाढ करत 1 डिसेंबर 2025 रोजी रात्री 10 वाजेपर्यंत प्रचार करण्यास परवानगी दिली आहे. या निर्णयामुळे उमेदवारांना मोठा दिलासा मिळाला आहे.

या संदर्भात माहिती देताना राज्य निवडणूक आयोगाचे अधिकारी जगदीश मोरे म्हणाले,
“नगरपरिषद आणि नगरपंचायतींच्या सार्वत्रिक निवडणुकांसाठी 2 डिसेंबर 2025 रोजी मतदान होणार आहे. ‘महाराष्ट्र नगरपरिषद, नगरपंचायत व औद्योगिक नगरी अधिनियम 1965’नुसार जाहीर प्रचाराची मुदत 1 डिसेंबर रात्री 10 पर्यंत असेल.”

निवडणुका अगदी जवळ आल्याने राज्यातील राजकीय वातावरण चांगलेच तापले असून पक्षांनी प्रचाराची गती अधिक वाढवण्याची तयारी केली आहे.

📢 जाहिरात सूचना
व्यावसायिक आणि वैयक्तिक जाहिरातीसाठी संपर्क करा
९२२१११७६८४
💬 WhatsApp वर संपर्क करा
Scroll to Top