मुंबई : महाराष्ट्र नवनिर्माण सेना अणुशक्तीनगर विधानसभा विभागाच्या वतीने गणेशोत्सव सजावट स्पर्धा–२०२५ अंतर्गत पारितोषिक वितरण व सन्मान सोहळ्याचे आयोजन करण्यात आले आहे. हा सोहळा बुधवार, दि. १७ डिसेंबर २०२५ रोजी सायंकाळी ५ वाजता चेंबुर येथील वाटिका बँक्वेट (सत्यभामा हॉल), डब्ल्यू. टी. पाटील मार्ग, अमर सिनेमा समोर येथे होणार आहे.
या कार्यक्रमाला मनसेचे ज्येष्ठ नेते व लोकप्रतिनिधी प्रमुख उपस्थित राहणार असून मा. आमदार नितीन सरदेसाई, मा. शिरीष सावंत, मा. संदीप देशपांडे, मा. कर्णाभाऊ दुनबळे, मा. रिटाताई गुप्ता, मा. संजय नाईक, मा. राजाभाऊ चौगुले आदी मान्यवरांची उपस्थिती लाभणार आहे. तसेच पक्षाचे विविध पदाधिकारी, विभाग व उपविभाग प्रमुख, महिला विभागाच्या पदाधिकाऱ्यांचीही मोठ्या संख्येने उपस्थिती राहणार आहे.
गणेशोत्सवाच्या काळात सामाजिक भान, पर्यावरणपूरक सजावट व सांस्कृतिक मूल्ये जपणाऱ्या मंडळांचा या सोहळ्यात सन्मान करण्यात येणार आहे. कार्यक्रमाचे आयोजन विभाग अध्यक्ष रवींद्र शेलार, सचिव सचिन ससाने, महिला विभाग अध्यक्षा अमिता गोरेगावकर यांच्यासह सर्व पदाधिकाऱ्यांच्या सहकार्याने करण्यात आले आहे. नागरिकांनी व कार्यकर्त्यांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहावे, असे आवाहन आयोजकांनी केले आहे.




