ताज्या बातम्या

वयगावकरांनी केला कृष्णा घाट स्वच्छ

ातारा(विजय जाधव) : लाखा भक्तांच्या हाकेला धावून येणाऱ्या वाई येथील ढोल्या गणपती असून मंदिराच्या परिसरातील घाटाची वयगाव गावकऱ्यांनी रविवारी पहिटे स्वयंस्फूर्तीने स्वच्छता केली. मुख्यमंत्री समृद्ध पंचायतराज अभियानात सहभागी असलेल्या या गावाची आदर्श वाटचाल सुरू आहे. यातून प्रेरणा घेत वाई येथे सामाजिक कार्यकर्त्या रुपाली परिट यांच्या संकल्पनेतून स्थायिक वयगावकर यांच्या सोबत एमआरए सेंटरचा ग्रामपरी टीम आणि गणेशभक्त यात स्तुत्य उपक्रमात सहभागी झाले होते.

स्वच्छता ही सेवा असे वृत जोपासणारे वयगाव गावात सध्या मुख्यमंत्री समृद्ध पंचायतराज अभियानाचा फिव्हर वाढू लागला आहे. शक्य तिथे सामाजिक बांधिलकीतून कार्य करण्यात योगदान देणाऱ्या या गावातील वाई परिसरात राहणाऱ्या ग्रामस्थांना रुपाली परिट यांनी चला, गणपती मंदिर आणि कृष्णा काठ स्वच्छ करु या, अशी हाक दिली. यातून स्वयंस्फूर्तीने एकवटून रविवार तब्बल दोन तासात कृष्णा घाट स्वच्छ करण्यासाठी घाम गाळला.
यात उपक्रमात रुपाली परिट, सारिका गवते, दिपक जाधव, मनिषा पवार, मारुती वाडकर, शंकर वाडकर, शिवाजी वाडकर, दिलीप वाडकर, सरपंच अश्विनी सुतार, उपसरपंच प्रशांत वाडकर, ग्रामपंचायत अधिकारी श्रीदेवी नुले यांच्यासह अनेक कार्यकर्ते सहभागी झाले होते

📢 जाहिरात सूचना
व्यावसायिक आणि वैयक्तिक जाहिरातीसाठी संपर्क करा
९२२१११७६८४
💬 WhatsApp वर संपर्क करा
Scroll to Top