Sunday, December 15, 2024
घरमहाराष्ट्रआदर्श असूनही सातारा जि प शिक्षक पुरस्काराविना....

आदर्श असूनही सातारा जि प शिक्षक पुरस्काराविना….


सातारा(अजित जगताप) : छडी लागे छम छम …विद्या येई घमघम असं पूर्वी गुरुजनाबद्दल बोलले जात होते. परंतु, गेली चार वर्ष सातारा जिल्हा परिषद प्राथमिक शिक्षकांना आदर्श पुरस्कार देण्यास टाळाटाळ करत आहेत असा आता सर्व शिक्षक वर्गाचा समज झालेला आहे.
सातारा जिल्ह्यातील 11 तालुक्यात प्रत्येक तालुक्यात एकच पुरस्कार देण्यात साठी केवळ दोन प्रस्ताव पाठवण्याचे आदेश दोन वर्षांपूर्वी सातारा जिल्हा परिषद शिक्षण विभागाने काढले होते. त्यामुळे गेल्यावर्षी खटाव तालुक्यातील एका शिक्षकांच्या पुरस्कारासाठी निवड तर दुसऱ्याच्या गुणांकन बाबत आक्षेप घेण्यात आले. याला राजकीय रंग लागला नाही तर आश्चर्य वाटले असते. परंतु, आता ऑनलाइन पद्धतीने प्रस्ताव घेणार असून मूल्यांकन जाहीर करू .अशी भूमिका शिक्षण विभागाने परस्पर घेतली होती. अद्यापही मूल्यांकन व गुणांकन सापडत नसल्याने सातारा जिल्हा परिषद शिक्षक दिन पुरस्कारापासून वंचित राहिलेले आहे. त्यामुळे आता सातारा जिल्हा परिषदेच्या प्राथमिक शाळेत शिकवणाऱ्या विद्यार्थ्यांना आदर्श शिक्षक पुरस्कार प्राप्त शिक्षक मिळेना अशी अवस्था झालेली आहे.
सातारा जिल्हा परिषदेमधील आदर्श प्राथमिक शिक्षक पुरस्कार आता तरी द्या अशी म्हणण्याची वेळ प्रशासकीय कारभारामुळे आलेले आहे.
सातारा जिल्हा परिषद मध्ये पूर्वी स्थानिक स्वराज्य संस्थेचे पदाधिकारी व सदस्य यांच्या शिफारशीला महत्त्व आले होते. त्यामुळे दरवर्षी जुलै ऑगस्ट महिन्यातच अनेकांच्या निवासस्थानामध्ये प्राथमिक शिक्षक व त्यांचे नातेवाईक तसेच लोकप्रतिनिधी जवळचे कार्यकर्ते शिफारशी करण्यासाठी धडे घेत होते. आता मात्र प्रशासकीय कारभारामुळे प्रशासकीय अधिकारी यांच्या हाती पाळण्याची दोरी असल्यामुळे प्राथमिक शिक्षकांना पुरस्कारासाठी पाळणा हलवा लागत आहे. खरं म्हणजे शिक्षणासारख्या क्षेत्रात आदर्श कारभार सर्वच शिक्षक करत असतात. पण, बदली व पदोन्नती या गोष्टी करताना राजकीय आश्रय घ्यावा लागतो. हे आता लपून राहिलेले नाही. समाजामध्ये अनेक आदर्श व्यक्ती आहेत. त्या पुरस्कारासाठी पात्र सुद्धा आहेत. वशिलेबाजी व हा तुझा…. हा माझा….. या निकषामुळे अनेक चांगले व आदर्श गुणवत्ताधारक शिक्षक वर्ग पुरस्कारापासून वंचित राहिलेले आहेत .त्यांना सेवानिवृत्ती होईपर्यंत पुरस्कार मिळणार नाही. परंतु, समाजातील अनेक लोक त्यांना आदर्श मानून पुढील दिशा ठरवत आहेत. हा त्यांचा खरं म्हणजे गौरव आहे .असा गौरव प्राप्त करणाऱ्या सर्वच घटकांना मानाचा मुजरा सातारकर नेहमीच करतात.
सध्या सातारा जिल्हा परिषदेच्या प्राथमिक शिक्षण विभागात प्रस्ताव आदर्श शिक्षक पुरस्कारासाठी दाखल केलेले अनेक प्रस्ताव धूळखात पडून आहेत .पण, पुरस्काराची यादी अद्यापही जाहीर झालेली नाही. एक वेळ नक्की पक्षाची उमेदवारी मिळेल पण सातारा जिल्हा परिषदेचा आदर्श शिक्षक पुरस्कार मिळणार नाहीत. अशी खंत काही अभ्यासू व जानकर शिक्षकांनी केलेले आहे. सातारा जिल्हा परिषदेच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांसमोर गुजरे गिरी करणाऱ्या काही शिक्षक नेते याबाबत मौन पाळून का आहेत ? असा प्रश्न प्राथमिक शिक्षक शिक्षक विचारू लागलेले आहेत. दुर्दैवाने त्यांच्यासाठी रस्त्यावर उतरण्याची मानसिकता कुणाची न झाल्यामुळे हा प्रश्न भिजत पडले आहेत .हे सुद्धा सत्य स्वीकारावे लागत आहे. दरम्यान, आता आचारसंहिता लागली तर सातारा जिल्हा परिषदेचा आदर्श शिक्षक यांना पुरस्काराविना राहावे लागणार आहे. ही खरे गोम लवकर पुढे निष्पन्न होणार आहे. अशी शंका घेतली जात आहे.

RELATED ARTICLES

प्रतिक्रिया द्या

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा

Most Popular

Recent Comments