ताज्या बातम्या
महायुतीत फूट पाडण्याचे प्रयत्न निष्फळ; ‘पुढे काय घडतंय ते पाहा’ – एकनाथ शिंदे यांचे सूचक वक्तव्य“माझ्या नेतृत्वावर विश्वास नसेल तर मी पक्षप्रमुखपद सोडायला तयार” : शिवसेनेच्या वर्धापन दिनी उद्धव ठाकरेंची भावनिक सादबेस्ट कर्मचाऱ्यांनी संप मागे घ्यावा; मुंबईकरांचे हाल टाळण्यासाठी परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांचे आवाहनधारावीकरांमध्ये पुनर्वसनाबाबत संभ्रम व असुरक्षिततेची भावना, विशेष बैठक आयोजित करून स्पष्ट धोरण व लेखी हमी द्यावी – खासदार वर्षा गायकवाड यांचे cm/dcm यांना पत्रRTE च्या नावाखाली पालकांची लूट? घणसोलीतील न्यू बॉम्बे सिटी स्कूलवर गंभीर आरोप; १ हजारांचा फॉर्म, १३,६०० रुपयांची ‘अँक्टिव्हिटी फी’ अनिवार्य?

गोवंडीच्या शताब्दी रुग्णालयातीलएमआरआय मशीन महिनाभरापासून बंद! ‘बेस्ट’चे माजी अध्यक्ष अनिल पाटणकर यांचा आंदोलनाचा इशारा

मुंबई : गोवंडी परिसरातील महापालिकेच्या शताब्दी रूग्णालयात गेल्या महिन्यापासून एमआरआय मशीन बंद असल्याने गोरगरीब रुग्णांचे मोठ्या प्रमाणात हाल होत आहेत. मशीन बंद असल्याने एमआरआय तपासणीसाठी रूग्णांवर खासगी रूग्णालयात जाण्याची वेळ आली आहे.त्यामुळे अशा रुग्णांना आर्थिक भुर्दंड सहन करावा लागत आहे. शताब्दी रुग्णालय हे पूर्व उपनगरातील रुग्णांच्या सतत वर्दळीचे केंद्र बनले आहे.याठिकाणी चेंबूर, गोवंडी,मानखुर्द, शिवाजीनगर,ट्रॉम्बे,माहुल गाव आणि वाशी नाका येथील सर्वसामान्य रुग्णांवर उपचार केले जातात.त्यामुळे शताब्दी रुग्णालयातील हे एमआरआय मशीन पालिकेने तत्काळ दुरुस्त सुरू करून नागरिकांना दिलासा द्यावा,अन्यथा आंदोलन छेडावे लागेल असा इशारा माजी बेस्ट समिती अध्यक्ष अनिल पाटणकर यांनी पालिकेच्या आरोग्य विभागाचे उपायुक्त संजय कुऱ्हाडे यांना एका निवेदनाद्वारे दिला आहे. दरम्यान,दररोज किमान ५०० रुग्ण या रुग्णालयात उपचारासाठी येत असल्याचे सांगितले जाते.मात्र या रुग्णालयातील एमआरआय मशीन बंद अवस्थेत आहे. त्यामुळे याठिकाणी येणार्‍या अशा तपासणीसाठी घाटकोपरच्या राजावाडी रूग्णालयात पाठवले जात आहे.

    Scroll to Top