प्रतिनिधी(महेश कवडे) : धारावीतील महत्वाचे ठिकाण तसेच जुनी ओळख असलेल्या पिवळा बंगला बस स्टॉप हा संपूर्ण पणे कब्जा केल्या सारखा दिसत आहे. स्थानिक नागरिकांना त्यामुळे ऊन,वारा, पाऊस यांचा सामना करत बस येण्याची वाट पाहत घाणीत उभे रहावे लागत आहे, पावसाळा सुरू असल्याने घाणीचे पाणी हे प्रवाशी यांच्या अंगावर येते, बस स्टॉप हा गर्दुल्ले, बेवडे आणि तिथं रहाणारे फेरीवाले यांनी चारी बाजूने सामान ठेऊन ताब्यात घेतला आहे, त्यामुळे विद्यार्थी, कामगार, प्रवासी यांना रोडवर पुढे येऊन उभे राहणे भाग पडत आहे. यावर प्रशासन आणि बेस्ट यांनी लवकरात लवकर पहाणी करून नागरिकांना बस स्टॉपची जागा मोकळी करून दयावी असे नागरिकांची मागणी आहे.


धारावी पिवळा बंगला बस स्टॉप जवळ स्थानिक नागरिकांचे पार्किंग, घाणीचे साम्राज्य आणि फेरीवाले यांचा कब्जा केला आहे महानगरपालिका व प्रशासन यांनी त्वरित दखल घेऊन संबंधित फेरीवाला यांच्यावर कडक कारवाई करून तो विभाग पूर्ण मोकळा करण्यात यावा अशी सर्वसामान्य नागरिक मागणी करत आहेत.