मुंबई:कांदिवली पूर्व येथील समर्थनगर एसआरए प्रकल्प अंतर्गत घरे मिळण्यासाठी झोपडीधारकांनी आत्तापर्यंत संघर्ष केला आहे. मात्र विकासकाने सर्वांचीच दिशाभूल केली आहे.या विरोधात समर्थनगर गृहनिर्माण संस्था न्यायालयात जाणार आहे.संस्थेचे ऍड .शिवाजीराव पाटील यांनी एसआरए सहकार विभागाला नोटीस पाठविली असून त्याचे उत्तर समाधानकारक न मिळाल्यास अंतिम लढाई न्यायालयात होईल असा इशारा त्यांनी दिला आहे.
एसआरएच्या सहकार विभागाने पात्र लोकांची यादी लावली असून त्यामध्ये अन्य संस्थेची ९८ घरे घुसवली आहेत.या संदर्भात .ऍड.पाटील यांनी एसआरए प्रशासनाला खडे बोल सुनावले आहेत.मूळ संस्थेची ५९८ घरे असताना त्यांना केवळ ४०६ घरे दिली आहेत.ती देखील अपुऱ्या अवस्थेत.त्यांना कोणतीच पूर्ण सुविधा नाही. मग अन्य घरे दुसऱ्या संस्थेतील सभासदांना मंजूर कशी केली? ती देखील संस्थेच्या परवानगी शिवाय, असा सवाल ऍड.पाटील यांनी नोटिशित विचारला आहे. विकासक दिनेश बन्सल आणि प्रभाकर शेट्टी यांनी या झोपडीधारकांची फसवणूक केल्याचा आरोप आहे.कोणतेही काम करारानुसार झालेले नाही. समर्थनगरचे मूळ जे १९२ लोक बाहेर आहेत .त्यांना ताबा दिला का? समर्थनगरच्या पात्र झोपडीधारकांचे प्रलंबित भाडे दिले का?असे अनेक प्रश्न अनुत्तरित आहेत.त्यांची उत्तरे एसआरए देणार आहे का? असा सवाल देखील संस्थेचे अध्यक्ष गोविंद पवार यांनी विचारला आहे. विकासकाने करारात जे नमूद केले होते. त्याची पूर्तता केलेली नाही. उलट झोपडीधारकांची फसवणूकच केली आहे. असा आरोप पवार यांनी केला आहे. आता ही लढाई न्यायालयात जाणार आहे .त्यामुळे आता आमचा न्याय देवतेवरच विश्वास आहे.असे देखील ते म्हणाले.दरम्यान कांदिवली पूर्वचे भाजप आमदार अतुल भातखळकर यांनी आम्हास पूर्ण सहकार्य केले असून अजूनही पुढची लढाई लढण्यास त्यांनी आम्हास सहकार्य करण्याचे आश्वासन दिले आहे. वेळप्रसंगी आंदोलनात उतरून आपण एसआरए प्रशासनाला जाब विचारू असे देखील भातखळकर यांनी संस्थेला आश्वासित केले आहे.आता एसआरए प्रशासन यावर कोणती भूमिका घेते याच्यावर पुढील कार्यवाही अवलंबून राहणार आहे.मात्र आतातर झोपडीधारकांनी एसआरएला घेराव घालण्याचा इशारा दिला आहे. लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर आता राजकीय नेते कोणती भूमिका घेतात हे देखील पाहणे औत्सुक्याचे ठरणार आहे.
झोपडीधारकांच्या अन्यायाविरोधात वकिलाची एसआरए प्रशासनाला नोटीस!कांदिवली समर्थनगर पुनर्वसन प्रकल्प न्यायालयात जाणार
RELATED ARTICLES