प्रतिनिधी : सद्गुरु दादा महाराज मोरे माऊली यांना आज दि 20 मार्च रोजी मुंबई येथे संत ज्ञानेश्वर माऊली यांची सुबक मूर्ती भेट देऊन वैद्यकीय मदत कक्षाचे संस्थापक अध्यक्ष कृष्णा मारुती कदम यांच्या हस्ते सत्कार करण्यात आला. यावेळी सोबत ज्ञानोबा बांदल उपस्थित होते. दादा महाराज मोरे माऊली गेली अनेक वर्ष आपल्या अमोघ वाणीतून कीर्तनातून समाज प्रबोधन करत आहेत. मुंबईसह, बडोदा, रायगड येथे त्यांचा अनुयायी वर्ग मोठ्या संख्येने आहे. गेल्या तीन वर्षापासून सुरू असलेल्या वैद्यकीय मदत कक्षाच्या टीमचे त्यांनी कौतुक केले आहे. रायगड मध्ये प्राथमिक उपचारासाठी रुग्णालय बांधले जावे ही चांगली बाब असल्याचे देखील सद्गुरु दादा महाराज मोरे माऊली यांनी वैद्यकीय मदत कक्षाच्या टीमशी चर्चा करताना केले. यावेळी आज मदत कक्षाच्या टीमने दादा महाराज मोरे माऊलीची भेट घेत त्यांना संत ज्ञानेश्वर माऊलीची सुंदर अशी मूर्ती भेट देऊन त्यांचा सत्कार केला असल्याचे वैद्यकिय मदत कक्षाचे अध्यक्ष कृष्णा कदम यांनी प्रतिक्रिया देताना सांगितले.
दादा महाराज मोरे माऊलीचां संत ज्ञानेश्वरांची मूर्ती भेट देत सत्कार
RELATED ARTICLES