Friday, September 19, 2025
घरमहाराष्ट्रधक्कादायक: कुमार महाराष्ट्र केसरी सूरज निकमची आत्महत्या 

धक्कादायक: कुमार महाराष्ट्र केसरी सूरज निकमची आत्महत्या 

प्रतिनिधी : कुस्ती क्षेत्रातून धक्कादायक बातमी समोर आली आहे. सांगलीमधील युवा पैलवान ‘कुमार महाराष्ट्र केसरी’ सूरज निकम राहत्या घरात गळफास घेऊन आत्महत्या केली. पोलिस याप्रकरणी अधिक तपास करत आहेत. या घटनेमुळे कुस्ती क्षेत्रावर शोककळा पसरली आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, पैलवान सूरज निकम हा मूळचा सांगली जिल्ह्यातील खानापूर तालुक्यातील नागेवाडी येथील रहिवासी आहे. त्याने त्याच्या राहत्या घरातच गळफास लावून घेतला आणि आयुष्य संपवलं. पैलवान सूरज याने आत्महत्या का केली यासंदर्भात पोलिस अधिक तपास करत आहेत. त्याचा मृतदेह शवविच्छेदनासाठी पाठवण्यात आला आहे. गेल्या वर्षी झालेल्या कुमार महाराष्ट्र केसरी स्पर्धेत त्याने कुमार महाराष्ट्र केसरी स्पर्धा जिंकत मानाची गदा पटकवली होती.
कुस्तीपटू सूरज निकम हा एक नावंत, प्रसिद्ध कुस्तीपटू आहे. यापूर्वी त्याने कुस्ती क्षेत्रात अनेक विजेतेपदं, खिताब पटकावले आहेत. विरोधी कुस्तीपटूला पराभूत करण्यात त्याचा हातखंडा होता. कुस्ती विश्वात अत्यंत कमी कालावधीत आपला दबदबा निर्माण करून कुमार केसरी होण्याचा मान त्याने मिळवला.

RELATED ARTICLES

प्रतिक्रिया द्या

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा

Most Popular

Recent Comments