
धारावी प्रेमनगर,कोळीवाडा पिवळा बंगला मागील मिठी नदीची नालेसफाई झालीच नाही महापालिकेची नालेसफाई की हातसफाई
प्रतिनिधी : धारावीतील प्रेमनगर,कोळीवाडा पिवळा बंगला मागील मिठी नदी, ६० फूट रोडचे मोठे नाले अद्याप साफ केलेले नसल्यामुळे पावसामुळे संबंधित ठिकाणी राहणाऱ्या लोकांच्या झोपड्या पाण्याखाली जाण्याची शक्यता नाकारता येत नाही, व मोठा धोका निर्माण होऊन जीवितहानी देखील होऊ शकतो. त्यामुळे महापालिका अधिकारी नालेसफाई झाली म्हणून जो दावा करत आहेत. तो पूर्ण चुकीचा असून यामध्ये ठेकेदाराला वाचवून मलिदा खाण्याचा प्रकार स्पष्ट दिसत असल्याचे दिसत आहे. थोडक्यात महापालिकाची नालेसफाईच्या नावाखाली की हातसफाई समजायची अशीच चर्चा धारावीतील जनता विचारत आहे. अजून म्हणावा असा पाऊस नसला तरी पुढे पाऊसाची शक्यता असून मुसळधार पाऊस पडला तर नक्की या पावसामुळे स्थानिक झोपडपट्टी मध्ये पाणी घुसून धारावी पाण्याखाली जाऊ शकते.तेव्हा जी नालेसफाई झालीच नाही ती पूर्ण नालेसफाई त्वरित करावी अशी मागणी धारावीतील जनता करत आहे. याबाबत पत्रव्यवहार सहाय्यक अभियंता (एसडब्ल्यूडी) यांचेकडे व महापालिका ग/उत्तर यांच्याकडे केलेला आहे.
चौकट
नालेसफाई की हातसफाई खरे काय ?
धारावीतील अनेक भागात नालेसफाई झालेली नाही,अर्धवट स्थितीत नाले असून पाणी भरून रस्त्यावर येत आहे.ज्या संस्थांना कामे दिली आहेत.त्या संस्था चालकांनी दत्तक योजनेच्या नावाखाली फक्त पैसे उचलण्याची कामे केली आहेत. “नालेसफाई की महापालिकेची हातसफाई” खरं काय ? धारावीतील नालेसफाई झाली का ? याचे उत्तर सहाय्यक अभियंता यांना विचारले तरी त्यांनी २० दिवस उलटून गेले तरी दिलेले नाही. यामध्ये ठेकेदाराला वाचवणे व त्याच्याकडून मलई खाण्याचे काम करणे एवढेच काम महापालिका संबंधित अधिकारी करतात असे नाव न सांगण्याच्या अटीवर स्थानिक समाजसेवक यांनी सांगितले.