ताज्या बातम्या

शिवसेना दक्षिण मुंबई यांच्या वतीने बाळासाहेबांच्या जन्मशताब्दी वर्षानिमित्त पालघरमधील आदिवासी बांधवांच्या मुलांसाठी अनोखा सामाजिक उपक्रम!

मुंबई : शिवसेना दक्षिण मुंबई यांच्या वतीने हिंदुहृदयसम्राट शिवसेनाप्रमुख वंदनीय बाळासाहेब ठाकरे यांच्या १०० व्या जयंती वर्षानिमित्त पालघर येथील आदिवासी भागातील चिमुकल्यांना पर्यावरणपूरक फटाके व शैक्षणिक साहित्याच्या किटचे वाटप करण्यात आले.

आनंदाचा उत्सव, शिक्षणाची साथ आणि पर्यावरण संवर्धनाचा संदेश देणारा हा उपक्रम राबविण्यात आला.

या उपक्रमास शिवसेना उपनेते रवींद्र मिर्लेकर, विभागप्रमुख संतोष शिंदे, विधानसभा प्रमुख विकास मयेकर, उपविभागप्रमुख बाजीराव मालुसरे व शाखाप्रमुख बाळा अहिरेकर यांचे मार्गदर्शन तसेच पालघर जिल्हाप्रमुख ओमकार पाटील, तालुकाप्रमुख नितीन पाटील आणि दयानंद पाटील यांचे विशेष सहकार्य लाभले.
या कार्यक्रमाचे आयोजन कट्टर शिवसैनिक वैभव अरुण लाडे यांनी पालघर जिल्ह्यातील पाली या आदिवासी गावात केले होते.

“बाळासाहेबांचे विचार मनात ठेवून, आनंदासोबत शिक्षणाची ज्योत प्रत्येक चिमुकल्यापर्यंत पोहोचवण्याचा एक छोटासा प्रयत्न”

Scroll to Top