ताज्या बातम्या

शीव रुग्णालयातील रुग्ण व नातेवाईकांच्या समस्यांवर तातडीने तोडगा काढा; शिवसेना वैद्यकीय मदत कक्षाची अधिष्ठात्यांकडे मागणी

मुंबई (शांताराम गुडेकर ) : महाराष्ट्राचे लाडके संवेदनशील उपमुख्यमंत्री मा.श्री. एकनाथजी शिंदे साहेब, शिवसेना खासदार मा. डॉ.श्रीकांतजी शिंदे साहेब यांच्या नेतृत्वाखाली तसेच शिवसेना वैद्यकीय मदत कक्षाचे संस्थापक अध्यक्ष मा. श्री.मंगेश चिवटे सर व शिवसेना वैद्यकीय मदत कक्ष कार्याध्यक्ष मा. रामहरी राऊत सर यांच्या मार्गदर्शनाखाली दि.२६/११/२०२६ रोजी लोकमान्य टिळक सर्वसाधारण रुग्णालय (शिव) येथे उपचारासाठी येणाऱ्या सर्वसामान्य व गोरगरीब रुग्णांना आणि त्यांच्या नातेवाईकांना भेडसावणाऱ्या विविध समस्या तातडीने सोडवण्यात याव्यात, अशी मागणी शिवसेना वैद्यकीय मदत कक्षाच्या वतीने करण्यात आली आहे.
या संदर्भात कक्षाचे राज्य उपाध्यक्ष श्री.जितेंद्र दगडूदादा सकपाळ व मुंबई पदाधिकारी टीम यांनी २५ नोव्हेंबर २०२६ रोजी रुग्णालयाचे अधिष्ठाता डॉ. श्री. प्रमोद इंगळे यांना निवेदन दिले आहे.महाराष्ट्र व देशाच्या विविध भागांतून मोठ्या संख्येने रुग्ण शीव रुग्णालयात मोठ्या आशेने उपचारासाठी येतात आपत्कालीन विभागात गंभीर व कमी गंभीर रुग्णांसाठी एकाच कक्षात तपासणी होत असल्याने गंभीर रुग्णांना वेळेवर उपचार मिळण्यात अडचण येते, तसेच व्हीलचेअर आणि स्ट्रेचरही पुरेशा प्रमाणात उपलब्ध नाहीत,महिला नातेवाईकांची सुरक्षितता: अपघात व आपत्कालीन विभागात दाखल रुग्णांच्या महिला नातेवाईकांना रुग्णालयाच्या आवारात उघड्यावर थांबावे लागते, ज्यामुळे सुरक्षिततेचा प्रश्न निर्माण होतो.लिफ्ट वारंवार बंद पडत असल्याने रुग्ण, ज्येष्ठ नागरिक आणि दिव्यांगांना त्रास सहन करावा लागतो,अपघात व आपत्कालीन विभागात नर्सेस, वॉर्ड बॉय, सफाई कर्मचारी आणि आवश्यक वैद्यकीय मनुष्यबळाची कमतरता जाणवते,बंद असलेली लिफ्ट व MRI मशिन तातडीने सुरू करणे या व इतर समस्यांबाबत अधिष्ठात्यांनी जातीने लक्ष घालून गोरगरीब रुग्णांना दिलासा देण्यासाठी प्रशासनाकडून या निवेदनाची गांभीर्याने दखल घेतली जाईल अशी अपेक्षा निवेदनाद्वारे व्यक्त करण्यात आली आहे.
याप्रसंगी शिवसेना वैद्यकीय मदत कक्षाचे मुंबई सचिव डॉ.नवीन शेवाळे,दक्षिण मध्य मुंबई सचिव श्री.विलास सांगळे,उत्तर मध्य मुंबई लोकसभा सचिव श्री.ललित आचरेकर,शिवडी विधानसभा प्रमुख श्री.प्रमोद बामने, धारावी विधानसभेचे उपाध्यक्ष श्री.विजय शिंदे,ईशान्य मुंबई लोकसभा सचिव श्री.समीर भंडारे,श्री.चेंबूर विधानसभा सचिव श्री.सचिन पाडाळे, धारावी विधानसभा सचिव श्री.प्रमोद शेवाळे, श्री.सुदेश पांडे,श्री.कल्पेश देशमुख, श्री.बाबासाहेब चौधरी, श्री.साईनाथ वर्पे,श्री.श्रीमंत कंपली, श्री.कादीर शेख, श्री.रोशन दुलगस, डॉ.नवनाथ पिजांरे,श्री.संतोष पंजाबी, श्री.रेहान,श्री.पिजांरे व शिवसैनिक उपस्थित होते.

Scroll to Top