ताज्या बातम्या

डाॅ.सतीश घाटगे यांना स्पंदन जीवन गौरव पुरस्कार जाहीर

तळमावले/वार्ताहर : पाटण तालुक्यातील डाकेवाडी (काळगांव) येथील स्पंदन चॅरिटेबल ट्रस्ट यांच्यावतीने देण्यात येणारा स्पंदन जीवन गौरव पुरस्कार यावर्षी डॉ.सतीश घाटगे (प्राचार्य, शिक्षणमहर्षी डॉ. बापूजी साळुंखे कॉलेज, कराड) यांना देण्यात येणार असल्याची माहिती ट्रस्टचे संस्थापक/अध्यक्ष डाॅ.संदीप डाकवे यांनी दिली आहे. गत वर्षापासून या पुरस्काराचे स्वरुप रोख रक्कम पाच हजार रुपये, मानपत्र, तात्या पुस्तक आणि कोल्हापूरी फेटा असे ठेवण्यात आले आहे.
यापूर्वी स्पंदन जीवन गौरव पुरस्कार अग्रलेखांचे बादशहा पद्मश्री नीलकंठ खाडीलकर (भाऊ), पद्मश्री डाॅ.विजय शहा, अँड.जनार्दन बोत्रे, खा.श्रीनिवास पाटील, प्राचार्य डाॅ.यशवंत पाटणे. डॉ.शिवाचार्य निळकंठ धारेश्वर महाराज यांना देण्यात आला आहे.
सदरील पुरस्काराचे हे आठवे वर्ष आहे. या कार्यक्रमात पहिला पाटण भूषण पुरस्कार, राज्यस्तरीय प्राईड ऑफ स्पंदन अवॉर्ड पुरस्कारही वितरित केले जाणार आहेत.
या पुरस्काराचे वितरण रविवार दि.29 नोव्हेंबर, 2026 रोजी सकाळी 10 वाजता सौ. वेणूताई चव्हाण सभागृह कराड, ता.कराड, जि.सातारा येथे होणार आहे. तरी याप्रसंगी जास्तीत जास्त लोकांनी उपस्थित रहावे असे आवाहन स्पंदन चॅरिटेबल ट्रस्टचे पदाधिकारी यांनी केले आहे.

Scroll to Top