ताज्या बातम्या

आगामी काळात महाराष्ट्रात मनसेला निश्चितच यश- श्री . गणेश सातपुते

गोंदवले(अजित जगताप) : महाराष्ट्राच्या समाजकारणामध्ये नेहमीच स्पष्ट भूमिका घेणाऱ्या “महाराष्ट्र नवनिर्माण सेनेने स्थापनेपासून कधीही सत्तेची अपेक्षा ठेवली नाही. उलट प्रशासनाला जाब विचारण्यासाठी अनेक आक्रमक आंदोलन केले आहे. आगामी काळात महाराष्ट्रात मनसेला निश्चितच मोठे यश मिळेल असा सार्थ विश्वास मनसेचे नेते व सातारा जिल्हा संपर्कप्रमुख श्री गणेश सातपुते यांनी गोंदवले तालुका माण येथे झालेल्या मनसेच्या मेळाव्यात व्यक्त केला .
माण तालुका दौऱ्यानिमित्त गोंदवले येथील मनसे जिल्हाध्यक्ष धैर्यशील पाटील यांच्या राजगड या मनसे संपर्क कार्यालयात आयोजित पदाधिकारी व कार्यकर्त्यांच्या मेळाव्यात ते बोलत होते. यावेळी मनसे नेते अमोल महाले, मनसे जिल्हाध्यक्ष धैर्यशील पाटील व युवराज पवार, गणेश पवार, मनविसेचे सातारा जिल्हाध्यक्ष सागर कट्टे यांच्यासह मान्यवर मनसे पदाधिकारी व मनसैनिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.
गोंदवले येथे फटाक्यांची आतषबाजी आणि जोरदार घोषणाबाजी करत मनसे नेते सातपुते यांचे जंगी स्वागत करण्यात आले. यावेळी सातारा जिल्हा अधक्ष म्हणून दुष्काळी भागातील मनसे नेतृत्व धैर्यशील पाटील यांनी खऱ्या अर्थाने समाजसेवेतून मोठी कामगिरी केली आहे. त्यांच्यामुळे सर्वसामान्यांना अडचणीतून मार्ग काढण्याची प्रेरणा मिळत आहे. आक्रमक आंदोलन करून प्रशासनाला जागे करण्याची धमक व धैर्य मनसे जिल्हाध्यक्ष श्री पाटील यांच्याकडे नक्कीच आहे. अशा शब्दात मनसे नेते सातपुते यांनी
धैर्यशील पाटील यांच्या कामाचा विशेष गौरव केला.

पश्चिम महाराष्ट्रात मनसे सैनिकांना सामान्य माणसांचे प्रश्न सोडवण्यासाठी आक्रमक भूमिका घ्यावीच लागेल. सत्ताधारी पक्षांमध्ये जाण्यामध्ये अनेकांना हित वाटत असले तरी मनसे सत्तेच्या बाहेर राहून सामान्य माणसासाठी सत्ता मिळवून देतो. हेच मोठे काम आहे. मनसे सैनिकांना अभ्यासपूर्ण प्रशिक्षण घेऊन स्थानिक प्रश्न समजून घ्यावेत व सर्वसामान्यांना न्याय मिळवून द्यावा. पक्ष प्रत्येक पदाधिकाऱ्याच्या पाठीशी खंबीरपणे उभा राहील. अशी ग्वाही देण्यात आली आहे.
“जनतेच्या प्रश्नांवर मनसेच्या नावाखाली आंदोलन करताना लोकशाही मार्गाने शांततेत आंदोलन केले पाहिजे. कोणीही मनसे सैनिकांनी कायदा हातात घेऊ नये. अन्यथा सत्ताधारी कायद्याचा धाक दाखवून मनसे सैनिकांना कायद्याच्या कचाट्यात अडकवण्याचा प्रयत्न करतील,” असा सल्लाही त्यांनी दिला.
यावेळी मनसे प्रमुख राज ठाकरे यांच्या भूमिकेचे स्वागत करून कार्यकर्त्यांचा मनसेत जाहीर प्रवेश केला. त्यांचाही मान्यवरांच्या हस्ते सत्कार व स्वागत करण्यात आले.
या मेळाव्या नंतर आगामी लोकसभा व विधानसभेच्या निवडणुकांची रणनीती आणि पक्ष संघटन वाढीबाबत पदाधिकाऱ्यांना महत्त्वाच्या सूचना देण्यात आल्या.

Scroll to Top