ताज्या बातम्या

आम्ही सातारकर विकास प्रतिष्ठानतर्फे २० डिसेंबरला ‘सातारा रत्न-भूषण पुरस्कार सोहळा २०२६’

मुंबई : आम्ही सातारकर विकास प्रतिष्ठानच्या वतीने मुंबई, ठाणे व नवी मुंबई परिसरातील सातारकर बांधवांचे भव्य स्नेहसंमेलन आणि ‘सातारा रत्न-भूषण पुरस्कार सोहळा २०२६’ रविवार, दिनांक २० डिसेंबर २०२६ रोजी परळ येथील राष्ट्रीय मिल मजदूर संघ हॉल, भोईवाडा येथे आयोजित करण्यात आला आहे.
या सोहळ्याच्या निमित्ताने राजकीय, कला, प्रशासकीय, साहित्य, उद्योग, कामगार, कायदा, सहकार, वैद्यकीय, पत्रकारिता, शैक्षणिक, क्रीडा, कृषी आणि सामाजिक अशा विविध क्षेत्रांत उल्लेखनीय कार्य करून आपला ठसा उमटविणाऱ्या कर्तृत्ववान व्यक्तींना ‘सातारा रत्न-भूषण पुरस्कार’ देऊन सन्मानित करण्यात येणार आहे.
या पुरस्कारासाठी पात्र व्यक्तींनी आपली नामांकने आवश्यक कागदपत्रांसह १० डिसेंबर २०२६ पर्यंत पाठवावीत, असे आवाहन प्रतिष्ठानच्या वतीने करण्यात आले आहे. नामांकन ई-मेलद्वारे aamhisatarkar25@gmail.com या पत्त्यावर पाठवता येईल. तसेच प्रत्यक्ष अथवा कुरिअरद्वारे आम्ही सातारकर विकास प्रतिष्ठान, बी/१, प्रोग्रेसिव्ह बिल्डिंग, डॉक्टर कम्पाउंड, चिंचपोकळी पूर्व, मुंबई – ४०००१२ या पत्त्यावरही सादर करता येईल.
नामांकनासोबत संबंधित क्षेत्रातील कार्याची माहिती, उपलब्धी आणि आवश्यक पुरावे व कागदपत्रे जोडणे आवश्यक आहे. १५ पानांपेक्षा अधिक कागदपत्रांची फाईल असल्यास ती प्रत्यक्ष किंवा कुरिअरद्वारे पाठवावी. १० डिसेंबरनंतर प्राप्त झालेल्या नामांकनांचा कोणत्याही परिस्थितीत विचार केला जाणार नाही, याची संबंधितांनी नोंद घ्यावी.
अधिक माहितीसाठी ९९८७१९९५६५, ९९६७९१५५७७, ९९८७१९९००१ या मोबाईल क्रमांकांवर अथवा ०२२-२३७४९६३८ या दूरध्वनी क्रमांकावर संपर्क साधावा.
मुंबई, ठाणे व नवी मुंबई परिसरातील सातारकर बांधवांनी या उपक्रमाची माहिती विविध सातारकर ग्रुपमध्ये प्रसारित करून अधिकाधिक पात्र व्यक्तींनी नामांकन पाठविण्यासाठी सहकार्य करावे, असे आवाहन आम्ही सातारकर विकास प्रतिष्ठानच्या वतीने करण्यात आले आहे.

Scroll to Top