मुंबई : महाराष्ट्राचे माननीय राज्यपाल श्री. जिष्णू देव वर्मा यांच्या शुभहस्ते ‘धगधगती मुंबई’च्या विशेष दिवाळी अंक २०२६ चे प्रकाशन लोकभवन येथे उत्साहात संपन्न झाले. यावेळी संपादक भीमराव बाळकाबाई हिंदुराव धुळप आणि ओमकार धुळप उपस्थित होते.
राज्यपालांच्या शुभहस्ते झालेला हा प्रकाशन सोहळा ‘धगधगती मुंबई’च्या वाटचालीतील एक महत्त्वपूर्ण आणि अभिमानास्पद टप्पा ठरला. अनेक दिवसांच्या नियोजनातून, अथक परिश्रमातून आणि मेहनतीतून साकारलेल्या दिवाळी अंकाचे प्रकाशन झाल्याने संपादकीय टीमचा आनंद द्विगुणित झाला.
या विशेषांकात नामवंत लेखक, पत्रकार आणि कवी यांचे वैविध्यपूर्ण लेख, कथा, साहित्य, राशिभविष्य, पाककृती, व्यंगचित्रे आणि मनोरंजनपर साहित्याचा समावेश करण्यात आला आहे.
वाचकांच्या पसंतीस उतरलेला हा दिवाळी विशेषांक दादर येथील आयडियल बुक डेपो, मॅजेस्टिक बुक डेपो, ठाणे येथील मॅजेस्टिक बुक डेपो तसेच राज्यातील विविध एसटी डेपोमध्ये उपलब्ध करून देण्यात आला आहे, अशी माहिती संपादक भीमराव धुळप यांनी दिली.




