ताज्या बातम्या

स्कॅनरद्वारे मदत मागणाऱ्या पत्रकार तुषार खरात विरुध्द लय भारी १०० कोटीचा दावा – राजू भै भोसले

सातारा : पत्रकारितेच्या माध्यमातून जनतेचे मूलभूत प्रश्न सोडवण्यास मदत होते. काही वेळेला राजकीय मंडळांच्या विरोधात बातमीदारी करावी लागते. परंतु, सातत्याने खोट्या बातम्या प्रसारित केल्याबद्दल स्कॅनर द्वारेमदत मागणाऱ्या साताऱ्यातील पत्रकार तुषार खरात विरोधात अब्रू नुकसानीचा शंभर कोटीचा दावा दाखल केल्याची माहिती अँड. कमलेश पिसाळ व सातारा जिल्हा परिषदेचे उपाध्यक्ष राजूभैय्या भोसले यांनी सातारा शासकीय विश्रामगृह येथे झालेल्या भरगच्च पत्रकार परिषदेत दिली. दिवाळीच्या तोंडावर घेतलेल्या या पत्रकार परिषदेला मोठ्या संख्येने प्रतिनिधी उपस्थित होते.
सातारा तालुक्यातील परळी भागातील श्री राजू भैया भोसले हे कष्टाने पुढे आले आहेत.
उरमोडी धरणासाठी त्यांच्या जमिनी गेल्या आहेत. शेतकऱ्यांसाठी त्याग करणारे त्यांचे कुटुंब आहे.शेतकऱ्याचा मुलगा कष्ट करुन, व्यवसाय करुन मोठा झालेला अनेकांना बघवत नाही, त्यामुळे सतत बदनामीचे प्रयत्न केले जातात. आतापर्यंत या प्रयत्नांकडे दुर्लक्ष केले होते. मात्र यापुढे असे प्रयत्न कराय
कोणालाही सोडणार नाही. पुराव्याशिवाय बदनामी केली तर कायदेशीर कारवाई करणार आहे.
लय भारी युट्युब
चॅनलच्या माध्यमातून तुषार खरात यांनी श्री राजूभैया भोसले यांचे समाज माध्यमावर जाणीवपूर्वक बदनामी केली आहे, त्याच्याविरोधात १०० कोटी रुपयाचा
अब्रुनुकसानीचा दावा न्यायालयात दाखल केला आहे. कोणत्याही युट्युब, फेसबुक, इन्स्टाग्राम व इतर
प्रसारमाध्यमातून कोणतेही बदनामीकारक वृत्त प्रसिध्द करु नये, अशी तुर्तातूर्त ताकीद न्यायालयाने खरात यांना
दिली आहे, अशी माहिती जिल्हा परिषदेचे उपाध्यक्ष राजूभैय्या भोसले यांनी दिली.
दि. २४ऑक्टोंबर२०२६ रोजी तुषार खरात यांनी स्वतःचे ‘लय भारी’ या युटयुब चैनल वर श्री भोसले व अदानी ग्रुप यांनी तारळे धरण येथे वीज निर्मितीचा प्रकल्प सुरु केला. अशी खोटी माहिती पसरवून
श्री भोसले यांचे नाव जोडून वाल्मिक कराड या व्यक्तीशी तुलना केली होती. याबद्दल समाज माध्यमातील युटयुब, फेसबुक, इंस्टाग्राम व इतर प्रसारमाध्यमांवर बदनामकारक व समाजामध्ये नावलौकीकास हानी पोहचेल, या प्रकारचे व्हिडीओ प्रसिद्ध केलेले आहेत. याबाबत सातारा येथील मेहरबान दिवान न्यायाधीश व स्तर यांच्या न्यायालयात स्पेशल दिवाने मुकादम नंबर २३१/२०२६ दाखल केला. हा अर्ज मंजूर केल्यानंतर लय भारी न्यूज मीडिया प्रायव्हेट लिमिटेड यांना तूर्त ताकीद दिलेली आहे कोणत्याही प्रकारचे व्हिडिओ प्रसिद्ध करू नये असं न्यायालयाने बजावली आहे. याप्रकरणी खरात यांना दिनांक १६ नोव्हेंबर रोजी न्यायालयात हजर राहून त्यांची बाजू मांडण्याचे आदेश हे न्यायालयाने दिले असल्याची माहिती देण्यात आलेली आहे.
समाजामध्ये गैरसमज पकडू नये यासाठी अशी भूमिका घेतल्याची ही माहिती श्री भोसले व अँड . पिसाळ यांनी बातमी छापणाऱ्या व दाखवणाऱ्या पत्रकारांना दिली आहे. दरम्यान, पत्रकारितेचा अनुभव असणाऱ्या पत्रकार तुषार खरात हे श्री भोसले यांच्या बदनामीचे फक्त माध्यम आहे. त्यांना कुणीतरी दुसरेच सांगत असले तरी सामाजिक कार्यातून काम करत आहे. निवडणुकीच्या माध्यमातून कोणी संपवू शकले नाही. असे श्री राजू भैया भोसले यांनी सांगितले .
यावेळी परळी भागातील सुमारे दीडशे समर्थक तिच्यासोबत भिकू भोसले, शंकर आप्पा चव्हाण, श्रीरंग देवरुखे, अजित साळुंखे, कामेस कांबळे, शोभा लोटेकर ,वसंत भंडारे, शंकर देवरे, बजरंग पवार, सोमनाथ जाधव, जांभळे, अंकुश मोरे, श्रीरंग रेटे व कार्यकर्ते उपस्थित होते. शासकीय विश्रामगृह सातारा येथे त्यांच्या चहापाण्याची व्यवस्था करण्यात आली होती. दिवाळीच्या तोंडावर या पत्रकार परिषदेला मोठ्या संख्येने इलेक्ट्रॉनिक व प्रिंट मीडियाचे पत्रकार उपस्थित होते. यावेळी काहींना दिवाळीनिमित्त शुभेच्छा देण्यात आल्या. तर काहीजण इतर ठिकाणी तातडीने निघून गेले. विशेष म्हणजे स्कॅनरद्वारे मदत मागणाऱ्या पत्रकार तुषार खरात यांनी बदनामीकारक मजकूर प्रसिद्ध केल्यामुळे त्यांच्यावर अब्रूचा दावा दाखल केला आहे. वास्तविक पाहता साताऱ्यात पत्रकार परिषदेमध्ये काही जण पैसे मागतात. काहीजण तर बातमी प्रसिद्ध न करता पत्रकार परिषदेमध्ये प्रश्न विचारतात. त्यांच्यासाठी हा इशारा असल्याची माहिती इलेक्ट्रॉनिक मीडियाचा अनुभव असलेल्या एका पत्रकारांनी निर्भीडपणाने दिली आहे. त्याचीही चांगली चर्चा रंगू लागली आहे.

Scroll to Top