सातारा (अजित जगताप ) : छत्रपती शिवाजी महाराजांच्या पदस्पर्शाने पावन झालेल्या जावळी तालुक्यातील एका किरकोळ घटनेमुळे जशास तसे उत्तर देण्याची भाषा मोर्चाच्या माध्यमातून केली आहे. किरकोळ ज्वालामध्ये तेल ओतण्याचे काम काही विघ्न संतोषी करत आहेत. अशावेळी छत्रपतींचे वंशज असलेल्या मंत्री शिवेंद्रसिंहराजे भोसले यांच्यावर मेढा येथील मोर्चामध्ये झालेल्या टीकेमुळे व्यतीत झालेल्या छत्रपतींच्या मावळ्याने मंत्री शिवेंद्रसिंहराजे भोसले यांच्या समर्थनार्थ आपली भूमिका विषद केली आहे. छत्रपती शिवरायांच्या स्वराज्याचे स्वप्न साकार करण्यासाठी साडेतीनशे वर्षांपूर्वी जावळीकरांनी त्यांना समर्थ साथ दिली आहे. लोकशाहीमध्ये सुद्धा आज सातारा- जावळी विधानसभा मतदारसंघाचे प्रतिनिधित्व करणारे सन्माननीय सार्वजनिक बांधकाम मंत्री शिवेंद्रसिंहराजे भोसले यांच्यासोबत जाती धर्मातील कार्यकर्त्यांसोबत अनेक मावळे आनंदाने विकास कामात सहभागी होत आहेत. जातीपातीच्या पलीकडे जाऊन मंत्री शिवेंद्रसिंहराजे भोसले यांनी विकास कामांच्या माध्यमातून जावळीत सब का साथ… सब का विकास.. निर्माण केला आहे. याबद्दल कुणाचेही मनात शंका नाही. परंतु, सध्या मोठ्या नेत्यांवर बोलल्याशिवाय आपली कोणीही नोंद घेणार नाही. याचा नवी मुंबईत धडा शिकून आलेल्यांचे कदम आता जावळीत सीजन बघून पडत आहे. त्यांच्यावर अंकुश ठेवल्याशिवाय आता पर्याय राहिलेला नाही. चुकीची व दिशाभूल करणारी भाषणबाजी करून जावळी तालुक्या सारख्या शांततामय तालुक्यात अराजकता बीज पेरले जात आहे . ते कदापि उगवून येणार नाही. कारण जावळीची माती ही कधीही रेडीमेड नेत्याचे नेतृत्व स्वीकारून देत नाही.
राजकीय स्वार्थाने प्रेरित झालेल्यांच्या हाती भोपळा सुद्धा राहणार नाही. याची त्यांनाही जाणीव आहे. अशा शब्दात सातारा शहरातील छत्रपतींचा मावळा व शिवप्रेमी अझहर मणेर यांनी भूमिका मांडली आहे.
छत्रपती शिवेंद्रसिंहराजे भोसले छत्रपती शिवरायांचे वंशज स्वतःला कधीही छत्रपती किंवा राजे म्हणवून घेत नाहीत. उलट अनेक जण त्यांना छत्रपतीचे वारसदार समजून त्यांच्या विचाराची पाठ राखण करतात. सन्मान राखतात. हे काहींच्या बालबुद्धीला पचवणे कठीण असल्यामुळे जावळी तालुक्यात पर्यटक म्हणून आल्यानंतर पैशाचे वाटप करून संधी निर्माण करून अधून मधून भाषणबाजी करतात. त्यामुळे काहींना रोजगार मिळतो. तर काहींना फुकटचे मनोरंजन होते. ही बाब जावळीकरांना आता अधिकच पटली आहे. त्यामुळे छत्रपती शिवरायांच्यावर इतिहास मध्ये हल्ला करणाऱ्या कृष्णा भास्कर कुलकर्णी प्रवृत्तीकडे लक्ष द्यायला जावळीकरांना वेळ नाही.
छत्रपती शिवरायांनी स्त्री सन्मानाला सर्वोच्च स्थान दिले. रांझ्याच्या पाटलाला केलेली शिक्षा हा त्याच न्यायनिष्ठेचा इतिहास आहे. आजही छत्रपती घराण्याचे वारसदार महिला अत्याचाराच्या बाबतीत कोणाचीही गय करत नाहीत.
जावळीतील एका प्रतिष्ठित घराण्यातील महिलांवर झालेल्या कथित हल्ल्याच्या प्रकरणातही छत्रपती शिवेंद्रसिंहराजे भोसले यांनी घेतलेली भूमिका आणि संबंधित राजकीय घडामोडी जावळीकर विसरलेले नाहीत. जावळी पंचायत समिती, सातारा जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेची निवडणूक किंवा स्थानिक ग्रामपंचायतीमध्ये विरोधकांचे कोणतेही अस्तित्व दिसून आले नाही. अशा रेडिमेड नेत्यांना जावळीकर चांगलेच ओळखून आहे. गल्लीबोळातील सामान्य कार्यकर्त्यांच्या सुद्धा पोस्टर बॅनर बिजागी घेऊन लावले जातात. हे पोस्टर कालांतराने नैसर्गिकरित्या उन्हाने पांढरे पडतात तर हिवाळ्यात गारठतात. पावसाने भिजून फाटतात. असे पोस्टर रेडिमेड नेते- कार्यकर्ते दुष्काळी परिस्थितीतही पायलीभर सापडतील. याकडे फारसे लक्ष देण्यासारखी गरज नाही. असे ही मणेर यांनी स्पष्ट केले आहे. ज्यांना जावळीचा इतिहास माहीत नाही. भूगोलाशी कधीही संबंध आला नाही. ते पी.एच.डी. झाल्यासारखे कुणीतरी लिहून दिलेले भाषण करतात. याची आता कीव करावी वाटत आहे.
जावलीतील पर्यटन वाढत आहे. विकास कामे गतीने होत आहेत. म्हणूनच त्यांच्या विजयाची संख्या वाढली आहे. व्यक्तिगत भांडणाला सार्वजनिक स्वरूप देऊन किंवा पोलीस ठाण्यामध्ये तडजोड केल्यानंतर पुन्हा तक्रार देण्याचे काम करणे. हे गैर आहे. असेही मणेर यांनी स्पष्ट केले आहे. अपघाताने निवडून आलेल्यांनी किती विकास निधी आणला? किती प्रश्न सोडवले ? याचं निवडून आलेल्यांना सुद्धा माहित नाही. मग, रेडीमेड नेत्याला ते कसे समजणार? असाही टोला अजहर मणेर यांनी लगावला आहे. राजकारणामध्ये निंदकाचे घर असावे शेजारी अशी म्हणी आहे. कारण काही डाग घालवण्यासाठी बिन साबणाची स्वच्छता करण्याचे काम काही जण इमाने इतबारे करीत आहेत. त्यामुळे राज्याचे सार्वजनिक बांधकाम मंत्री व सातारा- जावळी विधानसभेचे लोकप्रतिनिधी शिवेंद्रसिंहराजे भोसले यांची प्रतिमा अधिक उजाळून निघत आहे.
राजकीय लढाई विचारांची असावी, विकासकामांची असावी, जनतेच्या प्रश्नांची असावी. मात्र जावळीत राजकीय विरोधाला वैयक्तिक चारित्र्यहनन आणि खालच्या पातळीवरील आरोपांपर्यंत नेण्याची नवी संस्कृती काही लोकांच्या राजकीय अतिमहत्त्वाकांक्षेमुळे सुरू झाली आहे. त्यावर अंकुश ठेवण्यासाठी आता सर्वांनीच आपापले दमदार कदम पुढे केले पाहिजे. अशी अपेक्षा व्यक्त केली आहे. ………………………… फोटो- मंत्री शिवेंद्रसिंहराजे भोसले यांच्या समवेत मुस्लिम मावळा अजहर मणेर (छाया- अजित जगताप, मेढा)




