प्रतिनिधी : समता साहित्य अकॅडेमी, भारत सरकार प्रस्तुत राष्ट्रीय व आंतरराष्ट्रीय साहित्य परिषद – २०२४ मध्ये नामांकन होऊन दि. १० जुन २०२४ रोजी श्री. बळवंतराय ठाकूर म्युनिसिपल कम्युनिटी, अहमदाबाद, गुजरात येथे प्रसिध्द साहित्यिक व समाजसेवक डॉ. शांताराम कारंडे यांना साहित्य रत्न पुरस्कार प्रदान करण्यात आला. सदर पुरस्कार घेण्यासाठी डॉ. कारंडे यांना नियोजित कार्यक्रमामुळे अहमदाबाद येथे जाणे शक्य नसल्याने श्री. बाळकृष्ण कांबळे यांनी सदर पुरस्कार स्वीकारून चारकोप येथील कार्यालयात आणून डॉ. कारंडे यांना स्वाधीन केला. त्यावेळी भावी नगरसेविका सौ. सविता कांबळे व सौ. मोहिनी आंबोकर या उपस्थित होत्या. डॉ. कारंडे हे उद्योजक असले तरी ते कवी, लेखक, संपादक, वास्तुविशारद, विकासक व मनसे नेते आहेत. डॉ. कारंडे यांना हा २०२ वा पुरस्कार मिळाल्याने डॉ. कारंडे यांच्यावर विविध स्तरांतून अभिनंदनाचा वर्षाव होत आहे.
प्रसिध्द साहित्यिक व समाजसेवक डॉ. शांताराम कारंडे यांना साहित्य रत्न पुरस्कार प्रदान
RELATED ARTICLES