ताज्या बातम्या

विधानसभेसाठी पहिला उमेदवारांची घोषणा कोणत्या पक्षाने जाहीर केला उमेदवार ?

प्रतिनिधी : स्वाभिमानी शेतकरी संघटनेनं विधानसभा निवडणुकीची तयारी सुरू केली आहे.स्वाभिमानी जालना जिल्ह्यात स्वबळावर निवडणूक लढवणार असून मराठवाड्यातील स्वाभिमानीचा पहिला उमेदवार जाहीर करण्यात आलाय.जालन्यातील भोकरदन-जाफ्राबाद विधानसभा मतदार संघातून मयूर बोर्डे निवडणूक लढवणार असल्याची घोषणा स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे जालना जिल्हाध्यक्ष सुरेश काळे यांनी पत्रकार परिषदेच्या माध्यमातून केली
मयूर बोर्ड गेल्या अनेक वर्षांपासून स्वाभिमानी शेतकरी संघटनेत काम करत आहेत.सध्या ते स्वाभिमानीचे प्रदेशचे पदाधिकारी आहेत. शेतकऱ्यांना न्याय मिळावा या हेतूने त्यांनी आतापर्यंत अनेक आंदोलन केली असून सातत्याने पीकविमा, खतांचा काळाबाजार, पावसामुळं झालेले पिकांचे नुकसान, पावसाआभवी झालेले नुकसान या प्रश्नावर त्यांनी जाफराबाद तहसील आणि कृषी विभागासमोर आंदोलनं केलेली आहेत.त्यामुळे भोकरदन जाफ्राबाद मतदार संघातून उमेदवारी जाहीर केल्याबद्दल बोर्डे यांनी स्वाभिमानी पक्षाचे अध्यक्ष माजी खासदार राजू शेट्टी यांच्यासह जिल्हाध्यक्ष सुरेश काळे यांचे आणि पदाधिकाऱ्यांचे आभार मानले आहेत.

📢 जाहिरात सूचना
व्यावसायिक आणि वैयक्तिक जाहिरातीसाठी संपर्क करा
९२२१११७६८४
💬 WhatsApp वर संपर्क करा
Scroll to Top