ताज्या बातम्या

ठाकरेंच्या शिवसेनेला शिवाजी पार्कवर दसरा मेळाव्यासाठी  सशर्त परवानगी l 

मुंबई : शिवसेनेचा दसरा मेळावा आणि शिवाजी पार्क मैदान हे समीकरण यंदाही कायम राहणार असून उद्धव ठाकरे यांच्या शिवसैनिकाना विचाराचे सोने लुटण्यासाठी मुंबई महापालिकेने हिरवा कंदील दाखवला आहे. मात्र त्यासाठी रात्री १० पूर्वी सभा घेण्यासह एकूण २४ अटी घातल्या आहेत. दरम्यान, येत्या मंगळवारी (दि.२०) होणाऱ्या या मेळाव्यासाठी ठाकरे गटाकडून जय्यत तयारी सुरू आहे. देशभरात मुख्य निवडणूक आयुक्त ज्ञानेश कुमार यांच्या राजीनाम्यासाठी सुरू असलेल्या आंदोलन, राज्यातील दुष्काळच्या पार्श्वभूमीवर उद्धव ठाकरे त्यांच्यावर आणि पंतप्रधान मोदी,केंद्र व राज्य सरकारवर मेळाव्यात कशा पद्धतीने समाचार घेतात?, याकडे सर्वांचे लक्ष लागून राहिलेले आहे.

शिवसेनेत फूट पडल्यानंतर शिवसेना ठाकरे व एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वाखाली गटाकडून दोन स्वतंत्र मेळावे होतात. ठाकरेंचा नेहमीप्रमाणे शिवाजी पार्क मैदानावर तर शिंदेचा मेळावा गोरेगावातील नेस्लो मैदानावर मेळावा होणार आहे.
ठाकरे गटाचे खा. अनिल देसाई यांनी केलेल्या अर्जानंतर पालिकेच्या जी-उत्तर विभागाचे सहाय्यक आयुक्त यांनी मेळाव्याला परवानगी दिली आहे. त्यासाठी १९ व २० ऑक्टोंबर रोजी मैदान ताब्यात देणार आहे. त्यासाठी २४ अटी समोर ठेवल्या आहेत.
मैदानाच्या वापरासाठी प्रतिदिन ५०० रुपये + १८टक्के जीएसटी आणि २५० रुपये परवाना शुल्क भरावे लागणार आहे. २० हजार रुपयांची अनामत रक्कम भरावी लागणार आहे. हायकोर्टाच्या आदेशानुसार रात्री १० नंतर कोणताही कार्यक्रम घेता येणार नाही, मैदानावर वाहनांना प्रवेश नाही, ध्वनिप्रदूषणाचे नियम पाळावे लागतील, कार्यक्रमानंतर मैदान पूर्ववत करून द्यावे लागेल आणि कोणत्याही प्रकारचे नुकसान झाल्यास अनामत रक्कम जप्त करून पुढील वर्षी परवानगी नाकारली जाईल, असा इशाराही देण्यात आला आहे.
शिवाजी पार्क मैदानाच्या आत कोणत्याही वाहनास प्रवेश नाही. पार्किंग करता येणार नाही. -मैदानात कोणतेही खोदकाम, खड्डा करणे, खिळे ठोकणे, नुकसान करण्यास मनाई आदीचा समावेश आहे.
Scroll to Top