ताज्या बातम्या

दुष्काळग्रस्त शेतकऱ्यांच्या मदतीसाठी मुंबईत ‘लावण्यसोहळा’; तिकीट विक्रीतून निधी संकलन

मुंबई : महाराष्ट्रातील दुष्काळग्रस्त शेतकरी बांधवांची दिवाळी गोड करण्यासाठी लावणी कलावंत महासंघाच्या वतीने विशेष ‘लावण्यसोहळा’ आयोजित करण्यात आला आहे. सोमवार, २६ ऑक्टोबर २०२६ रोजी दुपारी ४ वाजता प्रभादेवी येथील रवींद्र नाट्य मंदिरात हा कार्यक्रम होणार आहे.

सांस्कृतिक मंत्री आशिष शेलार यांच्या आवाहनाला प्रतिसाद देत मुंबईतील टॉप १० लावण्यवती आपल्या कलाविष्कारातून शेतकऱ्यांच्या मदतीसाठी योगदान देणार आहेत. या कार्यक्रमातून संकलित होणारा संपूर्ण निधी दुष्काळग्रस्त शेतकऱ्यांच्या मदतीसाठी मुख्यमंत्री सहाय्यता निधीत दिला जाणार आहे.
तिकिटांचे दर १००, २००, ३०० आणि ५०० रुपये असे आहेत. मुंबईतील दानशूर नागरिकांनी तसेच लावणीप्रेमी रसिकांनी तिकिटे खरेदी करून या सामाजिक उपक्रमाला हातभार लावावा, असे आवाहन महासंघाच्या वतीने करण्यात आले आहे.
अधिक माहितीसाठी जयेश चाळके (९९३०४००१२२) आणि आकांक्षा कदम (९७५८३३९९०२) यांच्याशी संपर्क साधावा. संस्थापक अध्यक्ष संतोष लिंबोरे पाटील, अध्यक्षा कविता घडुशी, सरचिटणीस जयेश चाळके आणि विशाल सदाफुले यांनी या उपक्रमाचे आयोजन केले आहे.
Scroll to Top