मुंबई(के रविदादा) : महाराष्ट्रातिल प्रसिद्ध ज्येष्ठ अभिनेत्री आणि लावणीसम्राज्ञी मधु कांबीकर यांचं वयाच्या ७३ व्या वर्षी पुण्यात निधन झालं.
तमाशा, लावणी, नाटक आणि चित्रपटांतून रसिकांची मनं जिंकणाऱ्या कलाकाराच्या निधनाने मराठी कलाविश्वावर शोककळा पसरली आहे.
मनोरंजनाच्या विश्वातुन एक दुःखद बातमी महाराष्ट्र भर पसरली कि ज्येष्ठ अभिनेत्री आणि प्रसिद्ध लावणी कलावंत मधु कांबीकर यांचं सोमवारी दिनांक १२ अक्टोंबर २०२६ रोजी वयाच्या ७३ वर्षी पुण्यात प्रदीर्घ आजाराने त्यांची प्राणज्योत मालवली. आपल्या दमदार अभिनयाने आणि बहारदार लावणीने प्रेक्षकांची मनं जिंकणाऱ्या प्रसिद्ध अभिनेत्री . मधु कांबीकर यांच्या निधनामुळे मराठी चित्रपटसृष्टी आणि लोककला क्षेत्रात शोककळा पसरली आहे.
अभिनेत्री . मधु कांबीकर यांचा जन्म २८ जुलै १९५३ रोजी महाराष्ट्रातील बीड जिल्ह्यातील माळेगाव खुर्द येथे झाला. लहानपणापासूनच त्यांना लोककलेची आवड होती. तमाशाच्या फडातून त्यांनी आपल्या कलाप्रवासाला सुरुवात केली. पुढे लावणी, वगनाट्य आणि व्यावसायिक रंगभूमीवर त्यांनी स्वतःची वेगळी ओळख निर्माण केली.
‘गाढवाचं लग्न’, ‘विच्छा माझी पुरी करा’ आणि ‘भानगडीशिवाय पुढारी नाही’ यांसारख्या नाटकांमधील मधु कांबीकरांच्या भूमिका खुपच गाज लया लेल्या
रंगभूमीबरोबरच मधु कांबीकर यांनी मराठी चित्रपटसृष्टीतही मोठं योगदान दिलं. ‘शापित’, ‘एक होता विदूषक’, ‘झपाटलेला’, ‘बिनकामाचा नवरा’, ‘मुक्ता’, ‘चल रे लक्ष्या मुंबईला’ आणि ‘गोष्ट छोटी डोंगराएवढी’ यांसारख्या अनेक चित्रपटांत त्यांनी भूमिका सकारात्मक रुपाने बजावल्या .
‘शापित’ चित्रपटातील अभिनयासाठी त्यांना पुरस्कारांनी गौरवण्यात आलं होतं. मराठी चित्रपटसृष्टीतील योगदानाबद्दल २०१८ मध्ये मधु कांबीरकरांना ‘ झी चित्र गौरव जीवनगौरव पुरस्कार’ही प्रदान करण्यात आला होता.
नोव्हेंबर २०१६ मध्ये मुंबईतील यशवंत नाट्यमंदिरात लावणीच्या कार्यक्रमानंतर मधु कांबीकर यांना पक्षाघाताचा झटका आला होता. त्यानंतर त्यांच्या प्रकृतीवर गंभीर परिणाम झाले . उपचार सुरू असतानाही त्यांना पूर्वीप्रमाणे अभिनय आणि नृत्यक्षेत्रात सक्रिय राहता आलं नाही हे कला रसिकांचे दुर्भाग्यच
म्हणावे लागेल .
१९८२ साली प्रसिद्ध झालेल्या
शापित ह्या मराठी प्रसिद्ध चित्रपटातील गाणे
“तुझ्या माझ्या संसाराला आनि काय हवं
तुझ्या माझ्या लेकराला, घरकुल नवं
नव्या घरामंदी काय नविन घडंल
घरकुलासंग समदं येगळं होईल
दिस जातील, दिस येतील
भोग सरंल, सुख येईल
”
हे गाणे अतिशय लोकप्रिय झाले होते आणि आता ही ते गाणे लोकप्रिय आहे .
मधु कांबीकरांना समस्त कलावंता सहित माध्यमांची भावपूर्ण श्रद्धांजली .




