मुंबई (शांताराम गुडेकर ) :चेंबूर वेल्फेअर मराठी शाळा (प्राथमिक विभाग), भक्तीसागर को. ऑप हौ. सोसा. बिल्डींग नं. ५, नवीन म्हाडा वसाहत, वाशीनाका, चेंबूर, मुंबई येथील गरजू विद्यार्थ्यांना पंचरत्न मित्र मंडळाच्या वतीने शाळेतील गरीब व गरजू मुलांना वह्या, मोठा ब्लूटूथ स्पिकर, बिस्कीट, चॉकलेट, मॅगो फ्रुटी वाटप, शाळेकरीता खेळाचे साहित्य, डंबेल्स, लेझिम, कॅरमबोर्ड, चेसबोर्ड, फुटबॉल, क्रिकेटचे साहित्य, बॅडमिन्टन साहित्य, ग्रीन व ब्लॅक बोर्ड, प्रिंटर, वाटप करण्यात आले.चित्रकला स्पर्धा, कथाकथन सुलेखन स्पर्धेचा बक्षिस वितरणही करण्यात आला.
यावेळी प्रमुख पाहुणे म्हणून श्री.संजय पेटकर, महाप्रबंधक (सी. सी आणि सीएसआर आरसीएफ ),विशेष पाहुणे – ,मा. श्री. संतोष शिकतोडे, उपअभियंता, नवी मुंबई महानगर पालिका , श्री. गाडे.आर.पी. मुख्याध्यापक.. चेंबूर वेल्फेअर शाळा. माध्यमिक विभाग,मा. सौ. श्रद्धा उदय उजाळे मॅडम मुख्याध्यापिका,चेंबूर वेल्फेअर शाळा विशेष पाहुणे म्हणून आदी मान्यवर उपस्थित होते. प्रमुख पाहुणे मार्गदर्शन करताना म्हणाले की मातृभाषेतून शिक्षण घेतल्यास लगेच समजते, आकलन होते. अनेक नामांकित मराठी व्यक्तिमत्वांनी मराठी माध्यमातूनच शिक्षण घेतले, त्यांचे पुढे काही अडले नाही; त्यामुळे पालकांनी आपल्या मुलामुलींना मराठी माध्यमाच्या शाळांतून शिकवावे असे त्यांनी प्रतिपादन केले. पंचरत्न मित्र मंडळाचे अध्यक्ष अशोक भोईर, सचिव प्रदीप गावंड उपस्थित होते.
पंचरत्न मित्र मंडळाने नेहमीच समाजातील दुर्बल घटक सांठीविशेष तत्पर राहून मोठे योगदान दिले आहे शैक्षणिक संस्थांसाठी मदत कार्यात मोठी आघाडी घेतली असून या शाळेतील मुला मुलींनीही शिकून मोठे झाल्यावर इतर दुर्बल घटकांना मदतीचा हात देऊन समाज ऋणातून उतराई व्हावे असे आवाहन केले. वैभव घरत, श्री सचिन साळुंखे,सचिन राखाडे ,रमेश पाटील, डी.एफ . निंबाळकर नीलम गावंड, अंजली मोरया , स्वाती पाटील, स्नेहा नानीवडेकर, डीएम मिश्रा , मॅथ्यू डिसोजा ,उदय उजाले सुनील पवार श्रीकांत परब संदीप पाटील ,श्री सुरज संभाजी राऊत आदींनी कार्यक्रमाची धूरा सांभाळली. भेटवस्तू मिळाल्याने लहान विद्यार्थ्यांच्या चेहऱ्यावर आनंद पसरला होता.




