ताज्या बातम्या

स्वच्छ कराड’चा नारा; पण कचरापेटीचा आधार कुठे?

कराड : कोल्हापूर नाका येथे कराड नगरपरिषदेकडून ‘स्वच्छ कराड, सुंदर कराड’ असा संदेश देत स्वच्छतेबाबत जनजागृती केली जात आहे. मात्र कोल्हापूर नाका येथील प्रत्यक्ष परिस्थिती वेगळीच चित्र दाखवत आहे.
येथे स्वच्छतेचा संदेश देणारा फलक लावण्यात आला आहे; मात्र नागरिकांनी कचरा टाकण्यासाठी आवश्यक कचरापेटीच उपलब्ध नसल्याचे दिसून येत आहे. त्यामुळे नागरिकांनी कचरा नेमका कुठे टाकायचा, असा प्रश्न निर्माण झाला आहे.
फलकावर ‘स्वच्छ कराड’चा संदेश, पण कचरापेटीचा पत्ता नाही! अशी परिस्थिती असल्याने नगरपरिषद प्रशासनाने केवळ स्वच्छतेचे संदेश देण्यापेक्षा सार्वजनिक ठिकाणी पुरेशा कचरापेट्या उपलब्ध करून त्यांची नियमित साफसफाई करावी, अशी मागणी नागरिकांतून होत आहे.

Scroll to Top