महाबळेश्वर (अजित जगताप) : थंड हवेचे ठिकाण व पर्यटकांच्या आकर्षित केंद्र असलेल्या महाबळेश्वर मध्ये सध्या पर्यटकांची गर्दी वाढली आहे. स्थानिक प्रशासनाला गुंडाळून मनमानी कारभार करणारे अनेक व्यवसायिक आहेत. त्यांच्यापर्यंत कायदा पोहोचत नाही. परंतु, महाबळेश्वर मध्ये वरिष्ठांच्या सूचनेनुसार अन्न व औषध प्रशासनाच्या कठोर कारवाईने आठ हॉटेलवर कारवाई केली आहे. जात्यातले रडते व सुपातले हसते… अशी अवस्था पाहण्यास मिळाली आहे ‘ अन्न व औषध प्रशासन आयुक्त पदावर तुकाराम मुंढे यासारखे सक्षम अधिकारी नियुक्ती झाल्याने अन्न व औषध प्रशासनामध्ये सुदृढ असा गुण येऊ लागलेला आहे. अशक्तपणा नाहीसा झाला आहे. त्यामुळे प्रत्येक चांगले काम न करणारे हॉटेल व्यावसायिकांना आता शिस्तीचा मसाला टाकल्याशिवाय अन्न शिजवता येत नाही. स्वच्छतेबाबत कायद्याचा झाडू मारावा लागला आहे. महाबळेश्वर सारख्या पर्यटन ठिकाणी मोठ्या प्रमाणात हॉटेल व्यवसायिकांची जाळे आहे. त्यापैकी अन्न औषध प्रशासनाने कोणत्याही प्रकारची नोटीस न देता महाबळेश्वर येथील ‘रामसुख’, ‘इव्हरशाईन’, ‘ब्राईटलँड’, ‘कीज’चे परवाने निलंबित केले .’शेरवूड’, ‘ताज फाउंटन’, ‘भारत’, ‘टीजीएल’सह ‘बेला व्हिस्टा’वरही कारवाई करण्याचे धाडस केले आहे. या कारवाईचे पर्यटकांनीही मोठ्या प्रमाणात स्वागत केले आहे.
महाबळेश्वर सारख्या महत्त्वाच्या पर्यटन स्थळांमध्ये पर्यटकांना चांगल्या पद्धतीची सुविधा मिळवून दिली जाते. त्याच बरोबर भरमसाठ दर सुद्धा लावली जातात. परंतु, काही ठिकाणी हॉटेलची स्वयंपाक खोली व खाद्यपदार्थाचे साहित्य ठेवलेल्या जागेच्या बाबत स्वच्छतेच्या नियमांचे उल्लंघन केल्याप्रकरणी अन्न व औषध प्रशासनाने महाबळेश्वरमधील आठ नामांकित हॉटेल आस्थापनांवर धडक कारवाई केली आहे. यामध्ये हॉटेल रामसुख, हॉटेल इव्हरशाईन व पाचगणी महाबळेश्वर रोडवरील हॉटेल ब्राईटलँड आणि हॉटेल कीज यांचे खाद्यपदार्थ विक्री परवाने निलंबित केले आहेत. तर हॉटेल शेरवूड, हॉटेल ताज फाउंटन, हॉटेल भारत, टीजीएल , बेला व्हिस्टा या हॉटेल्सवरही प्रशासनाने कारवाई केली . हॉटेलमध्ये येणाऱ्या पर्यटकांची काळजी घेऊन स्वच्छतेसाठी त्रुटी दूर करण्यासाठी तातडीने नोटिसा बजावल्या आहेत. ऐन दिवाळीच्या पर्यटन हंगामात ही मोठी कारवाई झाल्याने आगाऊ आरक्षण केलेल्या शेकडो पर्यटकांनी आपले झालेले बुकिंग रद्द केले आहे. काहींनी दुसऱ्या हॉटेलमध्ये राहण्याचा निर्णय घेतला आहे. महाबळेश्वरमधील बड्या हॉटेल व्यावसायिकांना कधीही स्थानिक अन्न व औषध प्रशासनाच्या कारवाईला सामोरे जावे लागले नाही. यामध्ये नियमांच्या पालन ऐवजी काही गोष्टींचे पालन केले जात होते. सातारा येथील अन्न व औषध प्रशासन सहआयुक्त संजय शिंदे यांच्याकडे अनेकांनी निवेदन देऊन कारवाईची मागणी केली होती. त्यानुसार सातारा येथील अन्न व औषध प्रशासन पथकातील सदस्यांनी महाबळेश्वरच्या नामांकित हॉटेल्सच्या स्वयंपाकघरांची आणि खाद्य साहित्य ठेवणाऱ्या खोलीची सखोल तपासणी केली. या तपासणी दरम्यान स्वच्छतेसंदर्भातील नियमांचे उल्लंघन झाल्याचे प्रशासनाच्या निदर्शनास आले. त्यानुसार संबंधितांवर परवाना निलंबन आणि नोटिसा बजावण्याची कारवाई करण्यात आली आहे.
नामांकित हॉटेल्स मध्ये तयार करण्यात आलेल्या खाद्यपदार्थ विक्रीचे व्यवहार पूर्णपणे बंद ठेवावे लागले. दिवाळीच्या सुट्टीसाठी सुमारे एक हजार पर्यटक महाबळेश्वरला दाखल झाले होते. दोन ते तीन महिने आधीच महाबळेश्वरमधील काही मोठ्या हॉटेल्सचे आरक्षण झाले. जो हॉटेलची तपासणी झाली त्या ठिकाणच्या पर्यटकांनी दुसरीकडे जाण्यात धन्यता मानली आहे. त्यामुळे हॉटेलचे रूमचे दर सुद्धा वाढले आहेत. अनेक पर्यटकांना ऐनवेळी राहण्याची आणि जेवणाची पर्यायी व्यवस्था शोधण्यासाठी धावपळ करावी लागली, तर काहींना आपले नियोजित पर्यटन रद्द करून पुन्हा माघारी परतण्याचा निर्णय घेतला. महाबळेश्वर शहरामध्ये अनेक नामांकित हॉटेल चांगली सेवा देत आहेत. यांच्या बद्दल पर्यटन सुद्धा कौतुक करतात. परंतु, काही हॉटेलमधील गरम पाण्याची समस्या, निकृष्ट दर्जाचे खाद्यपदार्थ, रूम मधील बंद टी.व्ही. चॅनेल, अचानक वीज पुरवठा खंडित होणे. या समस्यांनाही काही पर्यटकांना सामना करावा लागत आहे. त्याची तपासणी व्हावी अशी मागणी पर्यटक कुटुंबाने केले आहे.




