तळमावलेे/वार्ताहर : महाराष्ट्र शासनाच्या सामान्य प्रशासन विभागाच्या निर्णयानुसार सातारा जिल्ह्यासाठी विशेष कार्यकारी अधिकारी पदाच्या नियुक्त्या जाहीर करण्यात आल्या आहेत. या निवडीमध्ये पाटण तालुक्यातील डाकेवाडी (काळगांव) येथील सौ.रेश्मा संदीप डाकवे यांची विशेष कार्यकारी अधिकारी पदी निवड झाली आहे.
सौ.रेश्मा डाकवे ह्या स्पंदन चॅरिटेबल ट्रस्टच्या सचिव आहेत. स्पंदन चॅरिटेबल ट्रस्ट गेली 10 वर्षापासून कार्यरत आहे. त्यांनी ट्रस्टच्या माध्यमातून 100 पेक्षा अधिक समाजोपयोगी उपक्रम राबवले आहेत.
या निवडीमुळे आतापर्यंत समाजाप्रती केलेल्या प्रामाणिक कार्याचा गौरव झाला आहे. तसेच यामुळे समाजात काम करताना आणखी जबाबदारीने काम करावे लागेल. स्पंदन ट्रस्ट ला विविध उपक्रमांसाठी वेळोवेळी कळत नकळत मदत केलेल्या सर्वांची मी मनापासून आभारी आहे. निवडीमुळे एकप्रकारे स्पंदन चॅरिटेबल ट्रस्ट च्या कर्तृत्वावर अभिमानाची मोहोर उमटली आहे. अशी भावना सौ.रेश्मा डाकवे यांनी याप्रसंगी व्यक्त केली आहे.
यापूर्वी रेश्मा डाकवे यांना महाराष्ट्र राज्य शासनाच्या महिला व बालविकास विभागाचा पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर पुरस्कार, यशवंतराव चव्हाण पुरस्कार, माॅंसाहेब जिजाऊ, राज्यस्तरीय समाजभूषण आदर्श महिला गौरव पुरस्कार इ.पुरस्कार मिळाले आहेत.
पालकमंत्री सातारा तथा पर्यटन, खनिकर्म, माजी सैनिक कल्याण मंत्री ना.शंभूराज देसाई यांच्या शिफारसीनुसार आणि महसूल मंत्री चंद्रषेखर बावनकुळे यांच्या अंतिम मान्यतेने ही नियुक्ती प्रक्रिया पूर्ण करण्यात आली आहे. सातारा जिल्हलंतील एकूण 3488 पात्र उमेदवारांना या पदासाठी मंजुरी मिळाली असून, यात रेश्मा डाकवे यांचा समावेश आहे.
या विषेश कार्यकारी अधिकारी पदी नियुक्ती झाल्याबद्दल रेश्मा डाकवे यांचे ना.शंभूराज देसाई, शिवसमर्थ समुहाचे कुटूंबप्रमुख ॲड.जनार्दन बोत्रे, पं.स.सदस्य पंजाबराव देसाई, स्पंदन चॅरिटेबल ट्रस्ट, शिवछत्रपती प्रतिष्ठानचे पदाधिकारी यांच्यासह विविध क्षेत्रातील मान्यवरांकडून अभिनंदन होत आहे.




