ताज्या बातम्या

अजितदादांचा घातपात करणाऱ्यांला मुख्यमंत्र्यांकडून वाचवण्याचा प्रयत्न : रोहित पवारांचा पुराव्यानेशी आरोपामुळे राजकीय वर्तुळात खळबळ

मुंबई(जमीर काझी) : दिवंगत उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या विमान अपघाताच्या तपासाबाबत सातत्याने तपास यंत्रणेच्या कडे पाठपुरावा करणारे राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार गटाचे नेते आ.रोहित पवार यांनी सोमवारी या संदर्भातील सर्वात धक्कादायक आरोप करून राज्यात खळबळ उडवून दिली.

दादांच्या अपघातामागे असलेल्या व्हीएसआर विमान कंपनीचे मालक व्ही.के.सिंह यांना दुसरे तिसरे कोणी नसून महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हेच वाचविण्याचा प्रयत्न करीत आहेत, असा खळबळजण आरोप त्यांनी पुराव्यानिशी केला. सिंह याच्याबद्दल सर्व पुरावे असतानाही फडणवीस त्यांच्या पाठीशी असल्यामुळे त्याच्याविरुद्ध साडेनऊ महिने उलटूनही अद्याप एफआयआर दाखल करण्यात आलेला नाही. माझ्या या आरोपाची मला राजकीय सामाजिक व आर्थिक किंमत चुकवावी लागणार आहे याची मला जाणीव आहे मात्र माझ्या काकाच्या हत्येचा छडा लागण्यासाठी मी सर्वस्वपणाला लावीत आहे असे त्यांनी भावनिक होऊन सांगितले. तसेचसत्ताधाऱ्यांनी पुराव्यानेशी माझ्या आरोपाला प्रत्युत्तर द्यावे असे आव्हानही केले.
दरम्यान, रोहित पवार यांनी केलेल्या आरोपाची भाजपाचे नेते व महायुतीतील नेत्यांनी इन्कार केला असून या खोट्या रोपावर महाराष्ट्रातील जनता विश्वास ठेवणार नसल्याचे म्हटले आहे.
चार दिवसापूर्वी यशवंतराव चव्हाण प्रतिष्ठानच्या बाहेर अजित पवार यांच्या अपघाता संदर्भात ‘मफलर मेन ‘असलेला फोटो लावून सोमवारी पत्रकार परिषद घेऊन त्याचा उलगडा करणार असल्याचे रोहित पवार यांनी जाहीर केले होते. त्यामुळे मपलर मॅन कोण आहे याबाबत राजकीय वर्तुळात प्रचंड उत्कंठा लागून राहिलेली होती. रोहित पवार यांनी सोमवारी सायंकाळी यशवंतराव चव्हाण प्रतिष्ठान मध्ये सुमारे दीड तास प्रेझेंटेशन करीत या अपघाता मागे संशयित विमान कंपनीचा मालक व्ही. के . सिंह असल्याचे अनेक पुरावे सादर केले व त्यांना मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी कसे पाठीशी घातले आहे, हेही पुराव्यानिशी उलगडून सांगितले.
विधानसभा निवडणुकीच्या निकालच्या दिवशी फडणवीस फडणवीस हे व्ही के सिंहच्या मुलाच्या जयपूरमध्ये झालेल्या कार्यक्रमामध्ये उपस्थित होते. त्याचा फोटो सादर करून आर्थिक व अन्य कारणामुळे त्याला वाचवण्याचा प्रयत्न केला असल्याचा आरोप l केला. यामध्ये जर चूक असेल तर सरकारने तपास करावा, असं आव्हानही त्यांनी दिले.
या सरकारने व्ही के सिंह आणि त्याच्या कंपनीला जरी वाचवण्याचा प्रयत्न केला असला तरी आमचं सरकार आलं तर त्याला सोडणार नाही. त्यांचा हा पुतण्या कुणालाही सोडणार नाही, असा इशाराही त्यांनी दिला.
ते म्हणाले,’दोन टन सोन्याची विमानातून निर्यात करणाऱ्या
व्ही. के. सिंह आणि व्हीएसआर कंपनीला वाचवणारे देवेंद्र फडणवीस हेच नेते आहेत . असे माझे ठाम मत आहे. ते महाराष्ट्राचे मुख्यमंत्री आहेत, यांच्याकडे सत्ता आहे, सीआयडी आहे. पंतप्रधान त्यांचं ऐकतात, सीबीआय त्यांचं ऐकू शकते. पण आतापर्यंत तपास का होत नाही? या आरोपाची मला प्रचंड किंमत मोजावी लागणार आहे. याची मला जाणीव आहे. मात्र जर मी
आमच्या काकाला न्याय देऊ शकलो नाही तर गरीबांना न्याय काय देणार? असा प्रश्न सातत्याने मनाला पडतोय. त्यामुळे मी जर दादांना न्याय देण्यासाठी काही गोष्टी समोर आणल्या तर उद्या माझे राजकारण धोक्यात येऊ शकेल. पण माझ्यावर त्याचा काही परिणाम होणार नाही. मी ज्या व्यक्तीचं नाव घेत आहे त्या व्यक्तीने अजितदादांचा घातपात केला असं मी म्हणत नाही. परंतु, अजितदादांचा अपघात झाला त्या कंपनीच्या मालकाला वाचवण्याचा प्रयत्न त्याच्याकडून केला जात असल्याचा आम्हाला संशय आहे, असे रोहित पवार यांनी सांगितले.
अजित पवारांच्या विमान अपघाताच्या तपासामध्ये सरकारी स्तरावरून काहीही प्रयत्न होत नाही, सीबीआयलाही या प्रकरणात गुन्हा दाखल करू वाटत नाही. त्यामुळे अजितदादांचा पक्षाला सत्तेत असूनही काहीही करता येत नसेल तर तो निर्लज्जपणा आहे, अशी टीका करून ते म्हणाले ,’अजितदादांच्या बंगल्याबाहेर काळी जादू करण्यात आली होती, त्यामध्ये कोकणातील एका नेत्याचा सहभाग असू शकतो, असं रोहित पवार म्हणाले. दादांच्या विमान अपघातासंबंधी डीजीसीएकडे अनेक पुरावे देऊनही त्यावर काहीही कारवाई झाली नाही. व्हिएसआर कंपनीचे संबंध ड्रग्ज तस्करांशी
अजितदादा गेल्यानंतर दोन दिवसात या कंपनीच्या मालकाच्या मुलाने, रोहित सिंहने अमेरिकेत १८ कोटींचे घर विकत घेतले. त्याने ज्याच्याकडून घर विकत घेतलं तो ड्रग तस्करीचं काम करतो. तसेच रोहित सिंहचा व्यावसायिक पार्टनर हा ड्रग्ज तस्करीमध्ये आहे. एका वेळी दोन हजार कोटींची तस्करी ते करतात. त्यामुळे या कंपनीचे सर्व व्यवहार हे संशयास्पद आहेत. त्यांच्याकडे भरमसाठ पैसा असल्यानेच त्यांच्या विरोधात आवाज उठवण्याचं सत्ताधाऱ्यांचं धाडस नाही. त्यामुळे व्ही के सिंह याला सत्ताधारीच वाचवत आहेत, असा आरोप रोहित पवार यांनी केला.
जोपर्यंत या लोकांची चौकशी होणार नाही तोपर्यंत सत्य समोर येणार नाही. व्ही के सिंह याच्या २७ कंपन्या आहेत. ८६८ कोटी पैसा कोलकात्याच्या कंपनीच्या माध्यमातून त्याने व्हाईटमध्ये केला. पण ईडी यावर काहीही प्रश्न विचारत नाही, हे दुर्दैव आहे, असे त्यांनी सांगितले.
अपघात की घातपात? या प्रश्नाचं उत्तर शोधण्याचा प्रयत्न एक कुटुंबीय म्हणून आम्ही करतोय, असं रोहित पवार म्हणाले. आमच्याकडे पोलीस व्यवस्था, सीबीआय नाही, पण आमच्याकडे प्रामाणिक कार्यकर्ते आहेत. आजपर्यंत अनेकांनी दादांच्या अपघातासंबंधी माहिती दिली. त्याच आधारे आतापर्यंत पाच प्रेझेंटेशन दिले. आताही ही महत्त्वाची माहिती सांगतोय त्यामागे अशा लोकांचा समावेश आहे, असे सांगून ते म्हणाले की, “दादांदा दौरा बदलणे, विमानाची वेळ बदलणे, अशा अनेक गोष्टी आम्ही सांगितली होती. दादा गाडीने बारामतीला जाणार होते, पण त्यावेळी तटकरे आणि प्रफुल पटेल यांच्या फोन आला आणि भेटायला येतो असं सांगितलं. एका व्यक्तीचा फोन आला आणि त्याने त्याच्या फाईलवर सही करायची आहे असं सांगून दादांना थांबवलं. त्यानंतर दादांचा दौरा पुढे गेला आणि दादांना गाडीने प्रवास टाळून विमानानं जावं लागलं. दादांच्या पक्षातील दोन नेत्यांमुळेच त्यांचा गाडीचा प्रवास थांबला आणि दादांना विमानाने जावे लागेल.”
अजित पवारांच्या अपघाताच्या प्रकरणात यंत्रणांनी वेळकाढूपणा केला. अजितदादांचा पक्ष आज सत्तेत असून त्यांच्याच आमदारांनी या प्रकरणात सीबीआय तपासाची मागणी केली, पण ती अद्याप मान्य करण्यात आली नाही, असे सांगून ते म्हणाले की, “अजितदादांच्या प्रकरणात आम्ही आधी बारामती पोलीस ठाण्यात गेलो. त्या ठिकाणचे पोलीस आधी गुन्हा दाखल करण्यास तयार होते. मात्र त्यांना कुणाचातरी फोन आला आणि त्यांनी नंतर गुन्हा नोंद करून घेण्यास नकार दिला. राज्यात काहीही क्षुल्लक घटना घडली तरी त्यावर गुन्हा दाखल होतो, पण एवढा मोठा नेता गेला तरी त्यावर काहीही होत नाही. त्यामुळे आम्ही कर्नाटकात जाऊन झीरो एफआयआर दाखल केला. नंतर तो गुन्हा महाराष्ट्रामध्ये आला आणि सीआयडीकडे हस्तांतर करण्यात आला. पण सीआयडीने हे जोडपत्र म्हणून स्वीकारलं, गुन्हा म्हणून स्वीकारलं नाही.”दादा गेल्यांतर १६८ कोटी रुपये व्हीएसआर विमान कंपनीला राज्य सरकारने दिले आहेत, असा आरोप रोहित पवारांनी केला. शेतकऱ्यांना द्यायला पैसा नाही, पण या कंपनीला देण्यात येणारे पैसे थांबत नाहीत. त्यामागे कुणाची शक्ती आहे, याचा तपास घ्यावा, असे आव्हान दिले.
———–
‘दादांच्या बंगल्याबाहेर काळी जादू, तपास का नाही?’
दादांचा अपघात झाला त्याच्या आदल्या दिवशी आणि अपघातानंतर पुढच्या तीन दिवसात समता पतसंस्थेमध्ये कोट्यवधींचा पैसा हस्तांतरीत करण्यात आला, अशी माहिती सामाजिक कार्यकर्त्या अंजली दमानिया यांनी सांगितलं आहे. त्यादरम्यान, अजितदादांच्या बारामतीतील घराबाहेर काळी जादू करण्यात आल्याचं समोर आलं.
——–
तीन गोष्टी जास्त काळ लपून राहू शकत नाहीत. सूर्य चंद्र आणि सत्य हे गौतम बुद्धांच वाक्य आहे. सत्य हे जपलं पाहिजे त्या अनुषंगाने मी राजकारण करत असतो. अनेकजण चेष्टा करतात की सत्तेच राजकारण मला करायला येत नाही. सत्य काय आहे हे शोधण महत्वाचं आहे.
विमाने आणि संबंधित ग्रुप याबाबत रोहित पवारांनी काही दावे केले आहेत, ते असे:,
विमान नंबर मॉडेल / किंमत स्लाईडनुसार संबंधित नाव
VT-CMR Legacy 600 / 125 कोटी JAYESH SHAH (NAMAN GROUP)
VT-CRA Learjet 45XR / 60 कोटी SANJAY PATHAK (मध्यप्रदेश)
VT-NSG Legacy 600 / 125 कोटी SANJAY GUPTA
VT-VRV Learjet 45XR / 60 कोटी HAVELLS GROUP
VT-DBL Learjet 45X / 60 कोटी DILIP BUILDCON
VT-TAT Falcon 2000 / 140 कोटी KULDIP SOLANKI (KISHAN)
VT-VSG Legacy 600 / 125 कोटी VISHVASAMUDRA GROUP
VT-DBG Legacy 600 / 125 कोटी WELSPUN GROUP
VT-MEG Pilatus / 40 कोटी USED BY HERITAGE GROUP
VT-TRI Learjet 45 / 40 कोटी SHASHIDHAR CHITAL… / TRIVE…
VT-SSK Learjet 45XR / 40 कोटी (DADA ACCIDENT) – लाल रंगात
VT-VSV Legacy 650 / 150 कोटी – ???
VT-VSV Legacy 650 हे 150 कोटींचे विमान कोणाच्या मालकीचे आहे? महाराष्ट्रातील त्या नेत्याने सांगावं, असं रोहित पवार म्हणाले.
Scroll to Top