परळी(अजित जगताप) : संपूर्ण महाराष्ट्राचे लक्ष वेधून घेतलेले सातारा जिल्ह्यातील इलेक्ट्रॉनिक मीडियाचे बघा…. बघा… फेम पत्रकार महेश पवार यांनी अन्नपूर्णा हॉटेल व्यवसायात पदार्पण केले आहे. आता गजवडी फाट्यावर अन्नपूर्णा हॉटेलमध्ये चविष्ट खाद्यपदार्थ भरपूर खावा.. खावा.. आणि इतरांनाही सांगा. असे आता नवीन घोषवाक्य निर्माण झाले आहे. सातारा तालुक्यातील समर्थ रामदास स्वामींच्या पदस्पर्शाने पावन झालेल्या सज्जनगड- परळी रस्त्यावर अन्नपूर्णा हॉटेलने शुद्धता जपली आहे. पत्रकारितेमध्ये एक वेगळा पायंडा पाडून सामान्य माणसांचे प्रश्न जनतेच्या दरबारात मांडणारे इलेक्ट्रॉनिक मीडियाचे पत्रकार श्री महेश पवार यांनी मोठ्या धाडसाने पत्रकारिता करून दाखवत आहेत . राष्ट्रीय पत्रकार दिनाच्या शुभ मुहूर्तावर हॉटेल व्यवसायात पदार्पण केल्यामुळे खऱ्या अर्थाने आता सातारा जिल्ह्यात पत्रकारितेमध्ये जोडधंदा हा आता गरजेचा बनला आहे. कोणत्याही क्षेत्रामध्ये वाटचाल करत असताना आपल्या उपजीविकेचे साधन निर्माण करणे. अत्यंत आवश्यक बनले आहे. कारण, राजकारण व पत्रकारिता क्षेत्रांमध्ये झपाट्याने केलेली प्रगती ही चर्चेचा विषय बनत असते. अशा काळामध्ये व्यवसायभिमुख प्रामाणिकपणाने धंदा करणे. त्यामध्ये गुणवत्ता व दर्जा कायम राखणे. याचा अनुभव श्री महेश पवार यांना आहे. बातमीदारीतून प्रश्नाकडे बघा… बघा… म्हणणारे.. महेश पवार आता चविष्ट शाकाहारी खाद्यपदार्थ तयार करून तुमच्या सेवेला तत्पर राहणार आहेत.
हॉटेल अन्नपूर्णा मध्ये चविष्ट व दर्जेदार अन्न आवडेल व पचेल तेवढे खावा.. खावा.. असा नवीन घोषवाक्य तयार झाला आहे. त्याला उदंड प्रतिसाद लाभला आहे. राज्याचे सार्वजनिक बांधकाम मंत्री श्री शिवेंद्रसिंहराजे भोसले व सातारा जिल्हा परिषदेचे उपाध्यक्ष श्री राजूभैया भोसले व श्री मोहन भोसले, संतोष जाधव, साताऱ्यातील मसाला किंग मनीष महाडवाले, शंकर देवरुखे, अमर मोकाशी व मान्यवरांच्या उपस्थितीमध्ये अन्नपूर्णा हॉटेलचे फित कापून उद्घाघाटन करण्यात आले.
या कार्यक्रमाला माजी सैनिक संपतराव पवार, सौ. सुलोचना पवार, अमर मोकाशी, सौ. धनश्री महेश पवार, बाळासाहेब पवार, अजित सोनवणे, शेडगे व ग्राहक वर्ग आणि ग्रामस्थ आवर्जून उपस्थित होते. अन्नपूर्णा हॉटेलमध्ये इडली- डोसा- मिसळ- पुरी भाजी याचा अनेकांनी स्वाद घेतला. लवकरच शुद्ध शाकाहारी जेवण सुद्धा हॉटेल अन्नपूर्णा मध्ये दिले जाणार आहे. अशी माहिती हॉटेल अन्नपूर्णाचे श्री महेश पवार यांनी दिली. पत्रकारांनी हॉटेल व्यवसायातही यशस्वी व्हावे. यासाठी ज्येष्ठ पत्रकार अजित जगताप, विजय मांडके, प्रकाश वायदंडे, संजय कारंडे, अजित भिलारे, अजय कदम यांनी शुभेच्छा दिल्या आहेत.





