ताज्या बातम्या

महाबळेश्वरातून संजय मोरे यांचा जिल्हा बँक निवडणुकीसाठी उमेदवारी अर्ज दाखल

तापोळा(नितीन गायकवाड) : सातारा जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेच्या सन २०२६ ते २०३१ या कालावधीतील संचालक मंडळाच्या निवडणुकीसाठी नामनिर्देशन प्रक्रिया सुरू आहे.
महाबळेश्वर पंचायत समितीचे विद्यमान उपसभापती संजय मोरे यांनी महाबळेश्वर तालुका मतदारसंघातून शिवसेनेच्या वतीने उमेदवारी अर्ज दाखल केला. यावेळी त्यांच्यासोबत शिवसेनेचे जिल्हा परिषद सदस्य अजितदादा संकपाळ, सह्याद्री कृषक सोसायटीचे अध्यक्ष विश्वनाथदादा संकपाळ, माजी अर्थ व शिक्षण सभापती अमितदादा कदम, युवासेना उपजिल्हाप्रमुख विशालदादा संकपाळ, पश्चिम महाबळेश्वर तालुकाप्रमुख गणेश उत्तेकर, उपतालुकाप्रमुख राम संकपाळ आदी उपस्थित होते.
तसेच सोळशी विकास सोसायटीचे चेअरमन संतोष मोरे, शिवसागर बोट क्लबचे चेअरमन आनंद धनावडे, युवा नेते सचिन कदम, ज्येष्ठ शिवसैनिक सुभाष कारंडे, सुनील संकपाळ, सतीश मोरे यांच्यासह अन्य मान्यवर उपस्थित होते.
सातारा जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेच्या २०२६-३१ कालावधीसाठी संचालक मंडळाच्या २१ जागांसाठी निवडणूक होत असून, उमेदवारी अर्ज दाखल करण्याची प्रक्रिया २५ सप्टेंबर ते १ ऑक्टोबर २०२६ या कालावधीत होती

Scroll to Top