सातारा(अजित जगताप) : संपूर्ण महाराष्ट्र मध्ये नावलौकिक प्राप्त केलेल्या सातारा जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेच्या पंचवार्षिक निवडणुकीमध्ये प्रतिष्ठित घराण्यातील राजकीय मंडळी सहभागी होत होते. आता ज्येष्ठ पत्रकार व सहकार संस्थेचा गाढ अभ्यास असलेले श्री विनोद कुलकर्णी यांनी बँक व नागरी पतसंस्था मतदारसंघातून उमेदवारी अर्ज दाखल केला आहे.
सातारा जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेत कधीही पत्रकारांना संधी दिली गेली नाही. अनेक पत्रकार हे विविध क्षेत्रांमध्ये नावलौकिक प्राप्त करत आहेत. काही पत्रकार साहित्य व सामाजिक तसेच सांस्कृतिक आणि सहकार क्षेत्रातही दमदार कामगिरी करत आहेत.
ज्येष्ठ पत्रकार विनोद कुलकर्णी यांना ज्येष्ठ सहकार तज्ञ दिवंगत विलास काका उंडाळकर पाटील, माजी खासदार लक्ष्मणराव पाटील, माजी सहकार मंत्री अभयसिंह राजे भोसले यांचे बहुमूल्य मार्गदर्शन लाभले आहे. जिल्हा बँकेच्या विविध मतदार व अनेक संचालकांशी त्यांचे जिव्हाळ्याचे व आपुलकीचे संबंध आहेत. सहकार चळवळीमध्ये ते अनेक वर्ष काम करीत आहेत. साताऱ्यातील विविध संस्थेमध्ये सहकारी कायद्याप्रमाणे त्यांनी आपला ठसा उमटवला आहे. त्यांच्या उमेदवारी अर्जामुळे सातारा जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेच्या सहकारी बँक व नागरी पतसंस्था मतदारसंघांमध्ये चांगली चुरस निर्माण झाली आहे. पत्रकार प्रतिनिधी सातारा जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेत श्री कुलकर्णी संचालक व्हावे. यासाठी मोठ्या प्रमाणात अनेकांनी शुभेच्छा दिल्या आहेत. ————————–
फोटो- ज्येष्ठ पत्रकार विनोद कुलकर्णी सहकारी बँक व पतसंस्थेतून अर्ज दाखल करताना यावेळी निवडणूक निर्णय अधिकारी संजयकुमार सुद्रिक व मान्यवर उपस्थित होते(छाया- निनाद जगताप, सातारा)




