ताज्या बातम्या

जिल्हा विशेष लेखापरीक्षक श्रीधर कोल्हापुरे यांचा शेतकऱ्यांनी केला सत्कार…

सातारा(अजित जगताप) : शासकीय सेवेतील प्रामाणिक अधिकाऱ्यांची नेहमीच कौतुक केले जाते. शेतकऱ्यांबद्दल असणारी त्यांची तळमळ व सहकार्य याची जाणीव ठेवून सातारा जिल्ह्याचे विशेष लेखापरीक्षक वर्ग १, सहकारी संस्थेचे अधिकारी मा. श्रीधर कोल्हापुरे यांच्या उल्लेखनीय कामाचे शेतकरी संघटना व शिवराष्ट्र युवक संघटना यांच्या संयुक्त विद्यमाने सातारा येथील कार्यालयात सत्कार करण्यात आला.
लेखा परीक्षक श्री कोल्हापुरे यांनी आपल्या कार्यकाळात अत्यंत पारदर्शक व लोकाभिमुख आणि गतिमान कारभार केलेला आहे. शेतकऱ्याशी निगडित संस्थांना योग्य न्याय देण्याचे काम त्यांनी केले. शेतकरी, कर्जदार, ठेविदारांचे प्रश्न कायद्याच्या चौकटीत सोडवण्यास आले. त्यांच्या प्रशासकीय कौशल्य आणि शेतकरी हिताच्या कामाचे सर्व स्तरातून खूप मोठ्या प्रमाणात कौतुक होत आहे.
या सत्कार प्रसंगी बोलताना शेतकरी संघटनेचे जिल्हाध्यक्ष विजयराव पाटील यांनी सांगितले की, श्री कोल्हापुरे यांच्या माध्यमातून शेतकरी कर्जमाफी यादी व चौकशी,तपासणी संदर्भात आणि उत्कृष्ट काम केले. गरीब शेतकऱ्यांना मोठा दिलासा दिला. पारदर्शक, स्वच्छ कारभाराबाबत- शिफाचे राष्ट्रीय अध्यक्ष, व शेतकरी संघटनेचे संस्थापक अध्यक्ष मा.रघुनाथराव दादा पाटील यांनी देखील फोनवरून श्रीधर कोल्हापुरे यांना शुभेच्छा दिल्या. त्यांच्या कार्याची नेहमीच कौतुक राहणार आहे.
यावेळी बोलताना शिवराष्ट्र युवक संघटनेचे संस्थापक अध्यक्ष चंद्रकांत पवार यांनी सुद्धा श्री कोल्हापूर यांचे कौतुक करून त्यांच्या कार्यामुळे यांनी पतसंस्था मधील भ्रष्टाचार घोटाळे – अपूर्ण कर्ज देणे, लुबाडणूक- लूट , मासिक चक्रवाढ व्याज घेणे, मुदलीकरण, कर्जामधील बेकायदेशीर कपाती,प्रतिष्ठान, स्वयंरोजगार व इमारत निधी घेऊन गोरगरीब कर्जदार शेतकऱ्यांची होणारी लूट, बेकायदा जप्ती व लिलाव कारवाई व बंद पडलेल्या संस्था व ठेवीबाबत संचालक मंडळावर गुन्हे दाखल करण्याच्या प्रक्रियेमध्ये त्यांनी खूप चांगले काम केले. त्यामुळे अनेक शेतकऱ्यांना न्याय मिळाला.
सत्कार सोहळ्याला ॲड. सौ. धुमाळ , ॲड. सौ. अश्विनी पाटील , माजी सरपंच, व माजी सैनिक नारायण सुर्वे महाराज, रसूलभाई मुलानी, खाशाबा जाधव प्रतिष्ठानचे अध्यक्ष -सचिनराव पाटील, एस. के.पाटील, शंकर सुर्वे, रामचंद्र येळवे, उत्तम खबाले, रंजनाताई पाटील, अशोकराव पाटील आदी मान्यवर उपस्थित होते.

————————————————
फोटो-
लेखापरीक्षक श्रीधर कोल्हापुरे यांचा सत्कार करताना शेतकरी संघटनेचे जिल्हाध्यक्ष विजयराव पाटील व शिवराज्य युवक संघटनेचे चंद्रकांत पवार व मान्यवर (छाया- निनाद जगताप, सातारा)

Scroll to Top