ताज्या बातम्या

61,221 नागरिकांनी घेतली CPR प्रशिक्षणाची शपथ; अपोलो हॉस्पिटल्सची विक्रमी नोंद

नवी मुंबई : आपत्कालीन परिस्थितीत नागरिकांना CPRचे प्राथमिक प्रशिक्षण मिळावे, या उद्देशाने नवी मुंबईतील अपोलो हॉस्पिटल्सने राबविलेल्या ‘सज्ज आहेत माझे हात’ अभियानाला मोठा प्रतिसाद मिळाला. 8 जुलै ते 7 ऑगस्ट 2026 या कालावधीत राबविण्यात आलेल्या या अभियानात 120 हून अधिक संस्था सहभागी झाल्या.

अभियानादरम्यान तब्बल 61,221 नागरिकांनी CPR प्रशिक्षणाची शपथ घेतली. या सहभागाची नोंद Guinness World Records मध्ये करण्यात आली आहे. शाळा, महाविद्यालये, कार्यस्थळे तसेच सामाजिक संस्थांमधील विद्यार्थी, शिक्षक, आरोग्य कर्मचारी आणि नागरिकांना CPR संदर्भात प्रशिक्षण व मार्गदर्शन देण्यात आले.

आपत्कालीन प्रसंगी CPRचे प्राथमिक ज्ञान असलेली व्यक्ती रुग्णाला वेळेत मदत मिळवून देण्यासाठी महत्त्वाची भूमिका बजावू शकते, असा संदेश या अभियानातून देण्यात आला. या विक्रमी कामगिरीच्या गौरव सोहळ्यास अपोलो हॉस्पिटल्सच्या कार्यकारी उपाध्यक्षा डॉ. प्रीथा रेड्डी आणि अभिनेत्री करिश्मा कपूर उपस्थित होत्या.

– ओमकार धुळप, धगधगती मुंबई

Scroll to Top