ताज्या बातम्या

कोंडवे रस्त्यावर बाजार .. शाहूपुरी पोलिसांच्या नोटीस कागदही रस्त्यावर….

सातारा(अजित जगताप) : सातारा शहरालगत असलेल्या कोंडवे रस्त्यावर सध्या मोठ्या प्रमाणात सायंकाळच्या वेळेला बाजार भरत आहे. मंगळवार दिनांक 29 सप्टेंबर रोजी सायंकाळी साडेपाच वाजता शाहूपुरी पोलीस ठाण्याच्या कर्तव्यदक्ष दोन कॉन्स्टेबलने संबंधितांना नोटीस दिली. सदर नोटीस कागदालाही रस्त्यावर आश्रय घ्यावा लागला. तर दुसऱ्या बाजूला डम्पिंग ग्राउंड मुळे कचरा सुद्धा स्टोर टाकल्याने धोकादायक स्थिती निर्माण झाली आहे.
शाहूपुरी पोलीस ठाण्याच्या हद्दीतील सातारा मेढा महाबळेश्वर रस्त्यावर कोंडवे हद्दीत मोठा अपघात झाल्यानंतर त्याचे विश्लेषण व उपायोजना होतील. असा काहींनी विश्वास व्यक्त केला. टू इन वन कारभारामुळे आदर्श संसद ग्रामपंचायत एकेकाळी फलक लागला होता. आता या गावाच्या प्रवेशद्वाराजवळच कचरा व बाजार भरत असल्याने चिंतेचा विषय झालेला आहे.
सातारा – मेढा- महाबळेश्वर रस्त्यावरील महत्त्वाचे केंद्रस्थान असलेल्या कोंडवे गावच्या हद्दीमध्ये सध्या मोठ्या प्रमाणात गृहनिर्माण प्रकल्प उभे राहिले. अनेकांनी प्लॉट खरेदी करून बंगले बांधले. सातारा शहरा नजीक असलेल्या या परिसरच्या विकासासाठी फारसं लक्ष दिले नसल्याने सर्व कारभार रस्त्यावर आलेला आहे. सुमारे आठ हजार लोकसंख्या असलेल्या कोंडवे गावामध्ये जावळी -सातारा –महाबळेश्वर तालुक्यातील मूळ रहिवास असलेल्या अनेकांनी या ठिकाणी गृहनिर्माण प्रकल्पात फ्लॅट व जागा घेऊन निवासस्थान बनवले आहे. मात्र नागरी सुविधा मिळत नसल्याने याबाबत आवाज उठवण्यात कुणीही तयार नाही.
अत्यंत महत्त्वाचे म्हणजे इस्कॉन भक्तिधाम कोंडवे गावाच्या हद्दीत इस्कॉन भक्तिधाम मंदिर धार्मिक केंद्र आहे. उजव्या बाजूला हे भव्य आणि शांत मंदिर आहे. येथील संध्याकाळची आरती आणि अध्यात्मिक वातावरण भाविकांसाठी मोठे आकर्षण आहे. पुणे मुंबई नवी मुंबई या ठिकाणाहूनही भक्त येत असतात. कोंडवे गावच्या प्रवेशद्वाराजवळ गर्दीच्या वेळेस सायंकाळी रस्त्यावरच बाजार भरवला जातो. काहींचे खाद्यपदार्थाच्या गाडा व त्यावरील पत्रा याचा एखाद्या वाहनाला धडक बसल्यास मोठा अपघात होऊ शकतो. तर दुसऱ्या बाजूला उघड्यावरील विहिरी आणि त्याच्या शेजारी टाकण्यात आलेला कचरा हा आरोग्याच्या दृष्टीने फारच हानिकारक झालेला आहे. काही लोक दररोज आजारी असतात. येथील स्थानिक कोडवेकरांनी शेती उद्योग तसेच शेतीला पूरक उद्योगांमध्ये स्वतःला सिद्ध केले आहे. त्याचबरोबर लघुउद्योग करून आपल्या उपजीविकेचा मार्ग स्वीकारला आहे. परंतु अनेक बाहेरून आलेल्या व कोंढव्या स्थायिक झालेल्या लोकांकडून घंटागाडी नसल्याने रस्त्यालाच घंटागाडी बनवून अनेक जण कचरा टाकतात. त्याच्या जोडीला आता भंगार व्यवसायिकांनी आपला बाजार थाटला आहे. भटक्या कुत्र्यांचा ही वावर वाढलेले लोकांना रस्त्यावरून चालत जाताना भीती मनात ठेवून जावे लागते. भूजल सर्वेक्षण विभागाच्या वतीने सौर ऊर्जेवर चालणारे नळ पाणी पुरवठा योजना हिरव्या वेलने बंदिस्त केली आहे. त्याकडेही कुणाचेही लक्ष नाही. अशी तक्रार रहिवासी करत आहेत. काल शाहूपुरी पोलिसांनी नोटीस देऊन आपलं कर्तव्य बजावले आहे. पण कोणीही आपला बाजार मोडून पाठीमागे सरकले नाहीत. हे वैशिष्ट्य ठरले आहे.
सातारा- मेढा- महाबळेश्वर हा रस्ता पर्यटकांसाठी सोयीचा असल्याने अनेक जण या मार्गावरून जातात. कोंडवे गावातील सुज्ञ नागरिकांनी व सामाजिक कार्यकर्त्यांनी याबाबत स्वच्छता मोहीम राबवून आपले गाव… आपलाच कारभार.. दुसऱ्यावर विसंबून नाही राहणार…. हे सिद्ध करून दाखवावे. राजकीय पद येथील व जातील. पण, कोंडवे गावच्या विकासाला हातभार लावला. तर याची कुठे तरी इतिहासात नोंद होईल. यासाठी तरी प्रयत्न करावा. अशी विनंती नागरिकांनीच केली आहे.

—————————————–
फोटो– कोंडवे तालुका सातारा येथील रस्त्यावर भरलेला बाजार व कचरा (छाया- अजित जगताप, कोंडव

Scroll to Top