मुंबई (शांताराम गुडेकर ) : भाऊ-बहीणच्या अतूट नात्याचा सण असलेल्या भाऊबीज निमित्त पंचरत्न मित्र मंडळ (रजि.)चेंबूर आणि कोकण कट्टा विलेपार्ले यांच्या संयुक्त विद्यमाने खरवली ग्रामपंचायत, ता.खालापूर अंतर्गत करंबेली वाडी व धनगर वाडी येथे तसेच स्वामी समर्थ मठ आपटा फाटा येथेही भाऊबीज भेट वाटप कार्यक्रम उत्साहात पार पडला.पंचरत्न मित्र मंडळ चेंबूर आणि कोकण कट्टाने ११ व्या वर्षीही करंबेली वाडी व धनगर वाडी येथील महिलांना भाऊबीज भेट देऊन त्यांचा सन्मान केला.यावेळी मोठ्या संख्येने महिला, ग्रामस्थ व कोकण कट्टा व पंचरत्न मित्र मंडळचे कार्यकर्ते उपस्थित होते.
यावेळी कोकण कट्टा विलेपार्लेचे अजित दीनानाथ पितळे, पंचरत्न मित्र मंडळ चेंबूरचे अशोक भोईर, प्रदीप गावंड यांनी उपस्थित भगिनींना भाऊबीजेच्या शुभेच्छा दिल्या.”बहिणीची माया आणि भावाचं प्रेम हेच आपल्या कोकणी संस्कृतीचं खरं वैभव आहे. ही भेट वस्तूची नाही,तर प्रेमाची आणि आपुलकीची आहे,”असे ते यावेळी म्हणाले.कोकण कट्टा व पंचरत्न मित्र मंडळ (रजि.)चेंबूर सदस्य मुंबईहुन दुरवरून इतक्या दुर्गम भागात अती परिश्रम घेऊन येणाऱ्या या एकमेव संस्था आजवर आहेत.ठाकूर सरांनी संस्थांचे आभार मानले विविध कार्यक्रमाचा उल्लेख करुन असेच कार्यरत राहावे हा संदेश दिला प्रशांत पाटील सरांनी कार्यक्रमाचे सूत्रसंचलन केले.
कार्यक्रमाचे आयोजन ग्राम संवर्धन व स्वामी समर्थ मठ आपटा यांनी केले.रायगड भूषण संतोष ठाकूर, महेश पाटील सर, नितीन म्हात्रे सर, राजू पाटील आणि सहकारी यांनी अथक प्रयत्नानी हा कार्यक्रम यशस्वी केला.प्रमुख अतिथी श्रीकांत हेगिष्टे, कोकण कट्टाचे अजित पितळे,पंचरत्न मित्र मंडळचे अशोक भोईर, प्रदीप गावंड, दादा गावडे, सुजीत कदम, विजय बाईत, निशिकांत मोरे, सुरेश भारती, सुनील मासाळ, मधुकर हेगडे, संभाजी चांदे आदी मान्यवर उपस्थित होते.
कार्यक्रमाला खरवली ग्रामपंचायतीचे पदाधिकारी, पंचरत्न मित्र मंडळाचे कार्यकर्ते व ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते.पंचरत्नचे अशोक भोईर,प्रदीप गावंड, सचिन साळुंखे, नीलम गावंड, रमेश पाटील मान्यवर उपस्थित होते.




