ताज्या बातम्या

सातारा जिल्ह्यात पिकांच्या नुकसानीचे पंचनाम्यासाठी खंडाळा तालुका आघाडीवर…

खंडाळा(अजित जगताप) : सातारा जिल्ह्यातील दुष्काळी भाग असलेल्या खंडाळा तालुक्यात पावसाने ओढ दिल्यामुळे शेतीचे प्रचंड नुकसान झाले आहे. राज्य सरकारने दुष्काळी तालुका म्हणून खंडाळा जाहीर केल्यानंतर सातारा जिल्ह्यात पिकांच्या नुकसानीचे पंचनाम्यासाठी खंडाळा तालुका आघाडीवर आहे.
. शेतकऱ्याच्या शेतात जाऊन तहसीलदार रविराज जाधव व महसूल कर्मचारी नुकसान झालेल्या पिकाची पाहणी करून वस्तुनिष्ठ पंचनामे करत आहेत. शेतकऱ्यांनी
ई-पिक पाहणी करून घेण्याचेही तहसीलदार जाधव यांनी केले आहे.

खरीप हंगाम २०२६ मध्ये (प्रथम कळ) लागू झालेल्या राज्यातील २६५ तालुक्यांमध्ये पिकांच्या नुकसानीचे पंचनामे तातडीने सुरू करण्याचे निर्देश महाराष्ट्र शासनाने दिले आहेत. याची तातडीने अंमलबजावणी खंडाळा तालुक्यात वेगाने होत आहे.

शेतकऱ्याच्या शेतात जाऊन खंडाळा तहसीलदार रविराज जाधव, ग्राम महसूल अधिकारी, कृषी सहाय्यक आणि संबंधित शेतकऱ्यांच्या उपस्थितीत खरीप हंगाम पिकाची पाहणी करून पंचनामे होत आहेत. त्यानुसार सर्वेक्षण केलेल्या क्षेत्रातील पिकांची सद्यस्थिती दर्शविणारी छायाचित्रे आणि जी. पी. एस. संकलित करून महाराष्ट्र शासनाला अहवाल सादर केला जाणार आहे.
खरीप हंगामातील नुकसान झालेल्या पिकाच्या
पंचनामा प्रक्रियेसाठी शेतकऱ्यांनी बँक खाते क्रमांक, आय. एफ. एस. सी. कोड, शेतकरी कार्ड आणि आवश्यक कागदपत्रे संबंधित शेतकऱ्यांनी तयार ठेवावीत, जेणेकरून पुढील कार्यवाही सुलभ होणार आहे.
शेतकऱ्यांनी महसूल विभागाच्या पंचनामा पथकांना सहकार्य करून ई-पिक पाहणी वेळेत पूर्ण करून घ्यावी, असे आवाहन तहसीलदार रविराज जाधव यांनी केले आहे. शेतकऱ्यांच्या शेतात तसीलदार स्वतः येत असल्याने शेतकऱ्यांना दिलासा मिळाला आहे. खंडाळा तालुक्यातील मिरजे येथे जावळी तालुक्यातील महू – हातगेघर धरणग्रस्तांचे पुनर्वसन झालेले आहे. त्यांच्याही शेतातील पिकांच्या पंचनाम्याची प्रक्रिया सुरू करण्यात आली आहे. अशी माहिती वहागावचे धरणग्रस्त सौ. छाया विलास वहागावकर आणि ॲड. विलास वहागावकर यांनी दिली आहे..

फोटो — खंडाळा तालुक्यात शेतावर जाऊन पिकाचे पंचनामे करताना तहसीलदार रविराज जाधव व महसूल कर्मचारी शेतकरी (छाया- अजित जगताप, खंडाळा)

Scroll to Top