ताज्या बातम्या

डॉल्बी प्रकरणी पोलिसांची मोठी कारवाई

उच्च न्यायालय मंबई व राज्य शासनाने निर्धारीत केलेल्या नियमांचे उल्लंघन करुन सार्वजनिक ठिकाणी उपद्रव होईल अशारितीने डॉल्बीचा वापर करणारे तसेच सार्वजनिक रस्त्यावर पादचारी व वाहनधारक यांना येणे जाणेस अटकाव करणाऱ्या वाहन चालकांचेवर कायदेशीर कारवाई करुन 2 कोटी 25 लाख रुपयांचा मुद्देमाल जप्त
पोलीस अधीक्षक निखील पिंगळे व सहकाऱ्यांनी उच्च न्यायालय मुंबई व राज्य शासनाने निर्धारीत केलेल्या नियमांचे उल्लंघन करुन सार्वजनिक ठिकाणी उपद्रव होईल अशा रितीने डॉल्बीचा वापर करणा-या व्यक्ती तसेच सार्वजनिक रस्त्यावर पादचारी व वाहन धारक यांना येणे जाणेस अटकाव करणाऱ्या वाहन चालकांवर प्रचलित कायदयान्वये कडक कारवाई करण्याचे निर्देश सातारा जिल्हा पोलीस दलास दिलेले आहेत. त्याअनुशंगाने सातारा शहर पोलीस ठाणे व शाहुपूरी पोलीस ठाणे कडील प्रभारी पोलीस अधिकारी यांचेकडून गणेश मंडळ, डॉल्बी मालक यांना कोणताही दखलपात्र अपराध केला जाण्यास प्रतिबंध करण्याकरीता नोटीस देण्यात आली होती.
सातारा शहरामध्ये गणेश विसर्जन मिरवणूक मार्गावर शाहुपूरी पोलीस ठाणे हद्दीत 12 व सातारा शहर पोलीस ठाणे हद्दीतील एकूण 3 गणेश मंडळांनी गणेश विसर्जन मिरणूकीमध्ये मा.उच्च न्यायालय मुंबई व राज्य शासनाने निर्धारीत केलेल्या नियमांचे उल्लंघन केले. संबंधितांवर एकूण 15 गुन्हे दाखल करण्यात आले असून 2 कोटी 25 लाख रुपये किमतीच्या डॉल्बी व वाहने जप्त करण्यात आली.

शाहुपूरी पोलीस ठाणे हद्दीत गणेश मंडळ व डॉल्बी मालक यांच्यावर कारवाई केलेल्या व्यक्ती नावे
*जय शिवराय मित्र मंडळ भैरवनाथ मंदिराजवळ करंजे.
१) केतन प्रविण वाघ, वय 29 वर्षे, रा.नांदगिरी ता.कोरेगाव जि.सातारा (ट्रॅक्टर चालक)
२) अनुज विलास फाळके, वय 25 वर्षे रा.सातारारोड पाडळी ता.कोरेगाव जि.सातारा (डॉल्बी मालक)

*नवरत्न गणेशोत्सव मंडळ करंजे.
१) रविंद्र राजेंद्र जाधव, वय 32 वर्षे, रा.जुने खेड ता.वाळवा जि.सांगली (ट्रक चालक)
२) शुभम शहाजी बाकले, वय 27 वर्षे रा.जुळेवाडी ता.कराड जि.सातारा (डॉल्बी मालक)
*अष्टविनायक गणेश मंडळ दौलतनगर सातारा.
१) जुनैद दाऊद शेख, वय 21 वर्षे, रा.कोंडवे ता.जि.सातारा (ट्रॅक्टर चालक)
२) प्रमोद चंद्रकांत औंधकर, वय 27 वर्षे रा.कोंडवे ता.जि.सातारा (डॉल्बी मालक)
*शाहुपूरी गणेश मंडळ शाहुपूरी चौक सातारा
१) जय अर्जुन इंगवले, वय 48 वर्षे, रा.डबेवाडी ता.जि.सातारा (टेम्पो चालक)
२) प्रदिप नारायण देवरुखे वय 48 वर्षे, रा.डबेवाडी ता.जि.सातारा (डॉल्बी मालक)
*विठ्ठल नगरचा विघ्नहर्ता गणेश मंडळ खेड सातारा
१) आदेश अरुण निकम, वय 25 वर्षे, रा.काळोशी ता.जि.सातारा (ट्रॅक्टर चालक)
२) अमित ज्ञानेश्वर पवार, वय 29 वर्षे, रा.सदरबझार सातारा (डॉल्बी मालक)
*श्रियश गणेशोत्सव मंडळ केसरकरपेठ सातारा
१) सुरज मुगूटराव कदम, वय 30 वर्षे, रा.निमसोड, ता.खटाव, जि.सातारा (डॉल्बी व टेम्पो मालक)
*सुयोग गणेशोत्सव मंडळ पायथा ग्रुप सातारा
१) विलास दादा शिर्के, वय 56 वर्षे, रा.म्हसवे ता.जि.सातारा ( टेम्पो चालक)
२) जिवन तुकाराम शिर्के, वय 34 वर्षे, रा.म्हसवे ता.जावली जि.सातारा (डॉल्बी मालक)
*एकता गणेशोत्सव मंडळ करंजे सातारा
१) पियुष गौरव सावंत, वय 22 वर्षे, रा.शाहुपूरी ता.जि.सातारा (ट्रॅक्टर चालक)
२) साहिल राजेंद्र बर्गे, वय 22 वर्षे, रा.कोरेगाव ता.कोरेगाव जि.सातारा (डॉल्बी मालक)
*बालस्मृती गणेश मंडळ केसरकरपेठ सातारा
१) विशाल राजेंद्र धनावडे, रा.जकातवाडी ता.जि.सातारा (ट्रॅक्टर चालक)
२) रजनीकांत चंद्रकांत नागे, वय 41 वर्षे, रा.84 मल्हारपेठ सातारा (डॉल्बी मालक)
*संघर्ष मित्रमंडळ सदरबझार सातारा.
१) दिपक बाबर रा.करंजे सातारा (ट्रॅक्टर चालक)
२) उमाकांत चंद्रकांत नागे, वय 39 वर्षे, रा.84 मल्हारपेठ सातारा (डॉल्बी मालक)
*शिवनगर गणेशोत्सव मंडळ मोरे कॉलनी सातारा.
१) भरत प्रविण जाधव, वय 35 वर्षे, रा.सातारारोड ता.कोरेगाव जि.सातारा (ट्रॅक्टर चालक)
२) माणिक पोपट शिंदे, वय 46 वर्षे, रा.सातारारोड ता.कोरेगाव जि.सातारा (डॉल्बी मालक )
*शिवतेज गणेशोत्सव मंडळ बुधवारपेठ सातारा.
१) स्वप्नील सुर्यकांत देशमुख वय 30 वर्षे रा.समतापार्क सातारा (ट्रॅक्टर चालक)
२) सुमित रमेश संकपाळ वय 30 वर्षे रा.नुने ता.जि.सातारा (डॉल्बी मालक)
*बाल गणेश तरुण मंडळ रविवारपेठ सातारा
१) संदिप चंद्रकांत नलवडे, रा.पांढरवाडी ता.जि.सातारा (ट्रॅक्टर चालक)
२) शुभम ज्ञानदेव खरात, रा.वनवासवाडी ता.जि.सातारा (डॉल्बी मालक)
*अजिंक्यतारा गणेशोत्सव मंडळ यादोगोपाळपेठ सातारा
१) परशुराम चंद्रम वलीकर, रा.वर्जेश्वरी मंदिराशेजारी मळवी खेड, सातारा (ट्रॅक्टर चालक)
२) प्रतिक सुनिल माने, रा.डबेवाडी ता.जि.सातारा (डॉल्बी मालक)
*भोसलेनगर गणेशोत्सव मंडळ भोसलेमळा करंजे सातारा
१) नितीन यशवंत भोसले, रा.भोसलेमळा करंजे सातारा (ट्रॅक्टर चालक)
२) हिमेश रमेश जाधव, रा.आर्वी ता.कोरेगाव जि.सातारा (डॉल्बी मालक)
३) अविष्कार अमोल सुतार, रा.कोडोली सातारा (स्ट्रॅक्चर तयार करणारा)

*बातमीचा सोर्स : पोलिसांनी दिलेली अधिकृत माहिती)

Scroll to Top