ताज्या बातम्या

निनाईदेवी विद्यालयाच्या २००४-०५ बॅचच्या माजी विद्यार्थ्यांकडून गरजूंना अन्नधान्य व दिवाळी साहित्याची भेट

कराड : दिवाळी हा आनंद, उत्साह आणि आपुलकीचा सण. या सणाचा आनंद केवळ स्वतःपुरता मर्यादित न ठेवता गरजूंपर्यंत पोहोचवण्याच्या उदात्त हेतूने निनाईदेवी विद्यालयाच्या २००४-०५ बॅचच्या माजी विद्यार्थ्यांनी सामाजिक बांधिलकी जपत एक स्तुत्य उपक्रम राबविला.
या उपक्रमांतर्गत माजी विद्यार्थ्यांच्या वतीने ५ पोती गहू, ५ पोती शाळू तसेच दिवाळीनिमित्त आवश्यक साहित्य देऊन मदतीचा हात पुढे करण्यात आला. सणासुदीच्या काळात गरजूंच्या चेहऱ्यावर आनंद फुलविण्याचा आणि त्यांच्या दिवाळीत गोडवा निर्माण करण्याचा या उपक्रमाचा उद्देश होता.
या सामाजिक उपक्रमासाठी विराज नायकवडी, महादेव वीर, गणेश कापसे, प्रदीप वीर, आनंदा खोत, संदीप शिंगण, प्रवीण यादव, विशाल पाटील, प्रताप भनगे, तन्मय नलावडे, निलेश मोरे, सचिन नलावडे, कृष्णत मोरे, आप्पा वीर, सुजाता पवार, अनुज सुहास कुराडे, राहुल वीर, शोभा बबन शिंगाडे, राहुल बबन शिंगाडे, दिपाली साळुंखे, शिवाजी साळुंखे, अशोक माने, सचिन भोसले, जिजाऊ राहुल कुराडे, श्रीकांत थोरात, जितेंद्र थोरात, मनोज गोरे, रेश्मा रमेश मोरे, तुषार मोरे, हर्षदा महादेव थोरात, संदीप सदाशिव कदम, संदीप नमसाले, सोनू कनोजीया, शंकर बापू पाटील, अभय शिंदे, अंकुश साळुंखे, संजय बजरंग पवार, अनिल वीर, अभय बाजीराव पिसाळ, सचिन शिवाजी नलावडे, अशोक शिवाजी वीर आणि सुरज पाटील यांनी आर्थिक व वस्तुरूपाने योगदान दिले.
शालेय जीवनातील मैत्रीचे नाते अनेक वर्षांनंतरही सामाजिक कार्याच्या माध्यमातून जपता येते, याचे उत्तम उदाहरण या माजी विद्यार्थ्यांनी घालून दिले आहे. केवळ जुन्या आठवणींमध्ये रमण्यापेक्षा एकत्र येऊन समाजासाठी काहीतरी करण्याची त्यांची भावना निश्चितच प्रेरणादायी आहे.
या उपक्रमातून सामाजिक एकोपा, मैत्री, सहकार्य आणि माणुसकीचा सुंदर संगम अनुभवायला मिळाला. या कार्यात योगदान देणाऱ्या सर्व सहकार्यकर्त्यांचे आयोजकांच्या वतीने मनःपूर्वक आभार व्यक्त करण्यात आले.

Scroll to Top