शिराळा : भावना,विचार आणि अनुभव व्यक्त करण्याचे सहज व सुलभ माध्यम म्हणजे कविता असते त्यामुळे बदलत्या काळाचे, बदलत्या वास्तवाचे प्रतिबिंब आजच्या कवितेत उमटायला हवे असे प्रतिपादन सुप्रसिध्द कवी – उत्तम सावंत यांनी केले.
करमाळे ता.शिराळा येथे नागभुमी साहीत्य मंच्यावतीने आयोजीत करण्यात आलेल्या खुल्या कविसंमेलनाच्या अध्यक्षस्थानावरुन बोलत होते यावेळी प्रा.दि बा पाटील, प्रा.दिपक स्वामी,आंनंदहरी,सरपंच- सचीन पाटील,डाॅ.विक्रम यादव,धर्मवीर पाटील, विक्रम जाधव,महादेव हवालदार,विद्या पाटील,अमर पाटील प्रमुख उपस्थीत होते.
यावेळी बोलताना उत्तम सावंत पुढे म्हणाले की,कवितेकडे पाहण्याची वेगळी दृष्टी असली की कवितेचे वेगवेगळे पैलू नव्याने समजतात.
मंचिय कवितांना चांगला प्रतिसाद मिळत असल्याने वैचारिक आणि प्रगल्भ कविता दुर्मीळ झाल्या आहेत अशी खंतही त्यांनी यावेळी व्यक्त केली.यावेळी प्रा.दि.बा पाटील,प्रा.दिपक स्वामी,यांनीही आपले मनोगत व्यक्त केले.
करमाळे येथे पार पडलेल्या बहारदार कविसंमेलनात विनायक कुलकर्णी, प्रा.दिपक स्वामी, विक्रम जाधव,संजय नायकवडी,सहदेव खोत,संजय पोळ,भगवान पाटील,संजय शेवाळे,विद्या पाटील,नथुराम कुंभार,सिंधुताई कचरे,अमृता पवार,अपेक्षा पाटील,तुकाराम पवार यांचेसह अनेक कविंनी आपल्या विविध विषयांवरील कविता सादर केल्या
या कवीसंमेलनाचे सुत्रसंचालन- विद्या पाटील यांनी केले तर शेवटी आभार आंनदहरी यांनी मानले.




