
सातारा (अजित जगताप) : भाजपा नेते व भारत देशाचे पंतप्रधान नरेंद्र दामोदर मोदी यांच्या २५ वर्षाच्या देश सेवेनिमित्त त्यांचा सन्मान राखण्यासाठी सातारा येथील शिवतीर्थावर भाजप निष्ठावंतांचेच दिवे बराच काळ तेवत होते. वाऱ्याच्या आगमनातही अनेक दिवे विजून गेले तरी निष्ठावंतांचे दिवे मात्र काही काळासाठी तेवत होते. हे अनेकांनी पाहिले.
राष्ट्रीय स्वयंसेवक संघ जनसंघ आणि नंतर भाजपमध्ये सेवेला साधना मानणारे देशाचे पंतप्रधान श्री नरेंद्र मोदीजी यांच्या जन्मदिनानिमित्त आज दि.१७ सप्टेंबर रोजी २६ रोजी सायंकाळी सात वाजता सातारा येथील शिवतीर्थावर छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्याला पुष्पचक्र अर्पण करून अभिवादन करण्यात आले. त्यानंतर उपस्थिताने सामुदायिकरित्या परिसरात दीप प्रज्वलित करून पंतप्रधान मोदीजींच्या सेवेला नमन केले . त्याचबरोबर भाजप नेते व देशाचे माजी पंतप्रधान
स्वर्गीय अटल बिहारी वाजपेयी पथ, पोवई नाका ते वाढे फाटा रस्ता दीप प्रज्वलनाने उजाळून टाकला. माननीय नरेंद्रजी मोदी यांना वाढदिवसाच्या शुभेच्छा दिल्यानंतर राजगिऱ्याचे लाडू व चटकदार भेळेचे वाटप करण्यात आले.
यावेळी सातारा नगरपालिकेतील भाजपचे पहिले नगरध्यक्ष अमोल मोहिते, उपनगराध्यक्ष दत्तात्रय बनकर, लोकसभा समन्वयक सुनील काटकर, विधानसभा प्रमुख नगरसेवक अविनाश कदम, सतरा पंचायत समिती सभापती महेश गाडे, शंकर माळवदे , भाजपा जिल्हा सरचिटणीस विकास गोसावी, विठ्ठल बलशेटवार, बाह्य मंडल अध्यक्ष वैशाली टंगसाळे, मध्य मंडल अध्यक्ष अविनाश खर्शीकर , डॉ. सचिन साळुंखे, सुनिषा शहा, होनमाने, धनंजय जांभळे, सचिन कांबळे, हर्षल चिकणे, संदीप माने व भारतीय जनता पार्टीचे पदाधिकारी आणि निष्ठावंत कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते. वाऱ्याच्या झुळकाने अनेकांनी पेटवलेले दिवे विजून जात होते. परंतु, त्यानंतर कापूर आणून अनेक दिवे पेटवले. विशेष म्हणजे निष्ठावंत भाजपच्या कार्यकर्त्यांनी प्रज्वलित केलेले दिवे बराच काळ वाऱ्याशी झुंजू देत टिकून होते. याचीही यानिमित्त प्रचिती आली. ………………………… फोटो- साताऱ्यातील शिवतीर्थावर दीप प्रज्वलन करताना पुरुष व महिला कार्यकर्त्या.. (छाया- अजित जगताप, सातारा )




